MNS
MNS 
पुणे

पीएमआरडीए आयुक्तांना निलंबित करा - मनसे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अनधिकृत बांधकामाच्या सुनावणीस आयुक्त उपस्थित राहत नाहीत, ही गंभीर बाब आहे. पीएमआरडीएच्या इतिहासात अशा प्रकारे वॉरंट बजावले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बाब दुर्दैवी आणि मानहानिकारक असून, राज्य सरकारने पीएमआरडीए आयुक्तांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. 

मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी यांनी याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, ‘‘पीएमआरडीए कशा प्रकारे बांधकाम व्यावसायिकांना हाताशी धरून सर्रास नियम धुडकावून कारभार करत असल्याचे हे ठळक उदाहरण आहे. नियम धुडकावून केल्या जात असलेल्या बांधकामांमुळे किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा अनुभव या पावसाळ्यात आला आहे.

पीएमआरडीएच्या कारभारात चाललेल्या गोंधळासंदर्भात लवकरच मनसेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर निवेदन देणार आहे. पण तत्पूर्वी पीएमआरडीए आयुक्तांना राज्य सरकारने निलंबित करावे; अन्यथा पक्षातर्फे पीएमआरडीए कार्यालय आणि नियम धुडकावून काम करणाऱ्या संबंधित विकसकाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले जाईल.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT