Swabhimani Shektar Sanganthan will start Shektar Karjmukti Abhiyan from July 1 demanding state Govt waive off the farmers loans  
पुणे

शेतकऱ्यांसीठी स्वाभिमानी शेतकरी संघटना मैदानात; एक जुलैपासून सुरु करणार कर्जमुक्ती अभियान

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक रविवारी (ता. 23) संपली. त्या नंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली.

मिलिंद संगई,

बारामती : राज्यातील शेतकरी कर्जाच्या खाईत असून त्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने शेतक-यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसाठी 1 जुलैपासून पुसदपासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती अभियान स्वाभिमानी शेतकरी संघटना सुरु करणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली.

बारामतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची दोन दिवसांची बैठक रविवारी (ता. 23) संपली. त्या नंतर माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली. सतीश काकडे, राजेंद्र ढवाण, अमर कदम यांच्यासह अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

राजू शेट्टी म्हणाले, राज्य कार्यकारिणीमध्ये 15 ठराव करण्यात आले आहेत. राज्यातील शेतकरी संकटात आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणी सरकारकडे केली आहे, ती मान्य न झाल्यास 1 जुलै पासून पुसद येथून कर्जमुक्ती अभियान सुरु करणार आहोत. कर्जमाफीसह संपूर्ण वीजबिल माफीचीही मागणी आम्ही केली आहे.

स्वाभिमानीच्या या आहेत प्रमुख मागण्या

• संपूर्ण कर्जमाफी व वीजबिलमाफी मिळावी

• गाईच्या दुधाला लिटरला सात रुपये अनुदान द्यावे

• पामतेल व सोयाबिन पेंडीच्या आयातीवर 40 टक्के कर लावावा

• कांदा निर्यातीवर शून्य टक्के कर असावा

• उसाची एफआरपी एकरकमी मिळावी, तुकडयात देऊ नये.

• पाणीपट्टीतील दहापट दरवाढ त्वरित मागे घ्यावी

• कृषीपंपांना मीटर बसवण्याचा निर्णय मागे घ्यावा

• रासायनिक खतांचे दर पूर्ववत करावेत

• पिकविम्याचे पैसे तातडीने शेतक-यांना द्यावेत

• शेतकरी व शेतमजूरांच्या मुलांच्या शैक्षणिक कर्जाला राज्य शासनाने हमी द्यावी व बिनव्याजी कर्ज द्यावे

• भूमीअधिग्रहण कायदयात बदल करुन पूर्वीप्रमाणे चौपट मोबदला द्यावा

• शेती साहित्याचा जीएसटी परतावा शेतक-यांना द्यावा

• वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान विमा कवचात आणून चौपट नुकसानभरपाई मिळावी

• महिला बचत गटांची कर्जे माफ व्हावीत

• उसाच्या वजनकाटयांना ऑनलाईन करुन संगणक प्रणालीला जोडावे

सध्या तरी एकला चलो रे....

महाविकास आघाडी व महायुती या पैकी कोण शेतकरी हिताची भूमिका आगामी दोन महिन्यात घेतात हे पाहावे लागेल, त्या नंतरच स्वाभिमानी शेतकरी संघटना विधानसभेबाबत आपले धोरण जाहीर करेल, असे सांगत सध्या तरी एकला चलो रे अशीच आमची भूमिका आहे. योग्य वेळ येताच या बाबत निर्णय जाहीर करु, अनेक मतदारसंघात स्वाभिमानीचे उमेदवार विधानसभा लढण्यास उत्सुक आहेत- राजू शेट्टी, माजी खासदार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT