खडकवासला (पुणे) - 'पीएमपीएमएल'ची बससेवा ही आम्हाला फक्त प्रवाशी वाहतूक नाही. तर आमच्यासाठी ही विकासगंगा आहे. अशा भावना रांजणे खामगाव खोऱ्यातील नागरिकांनी व्यक्त केली. 'पीएमपी'ची स्वारगेट ते रांजणे खामगाव (पाबे घाट पायथा) अशी बससेवा आज पासून सुरू करण्यात आली. त्यावेळी उपस्थित नागरिकांनी भावना व्यक्त केल्या आहेत. सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या वेल्हे व हवेली तालुक्यातील दुर्गम अश्या रांजणे खामगाव छत्र, आंबेड, कोंडगाव, खामगाव मावळ, घेरा सिंहगड, मालखेड गावांना या सेवेचा लाभ होणार आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, संचालक शंकर पवार आणि व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांचे आभार मानले. या खोऱ्यातील नागरिकाच्या अनेक दिवसांच्या मागणीला आज यश आले. या दुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नव्हती. लोकांना तासंतास खासगी प्रवाशी गाडीची वाट पाहावी लागत होती. वेळप्रसंगी पुण्याला जाण्यासाठी चालत खानापूर, मालखेड या ठिकाणी जावे लागत होते. शालेय विद्यार्थी, कामगार, नोकर वर्ग, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांचे खूप हाल होत होते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
रांजणे गावात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बस वाहक सचिन खोपडे आणि चालक चंदनशिव नवगिरे, बसचे पहिले प्रवासी मुरलीधर दारवटकर यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच अमृता दारवटकर, माजी सरपंच दत्ता भाडळे, माजी पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, सरस्वती शिक्षण संस्थचे शिवाजी जाधव, राष्ट्रशक्तीचे माऊली दारवटकर, माजी सरपंच दिलिप दारवटकर यांच्या हस्ते बसची पूजा करण्यात आली. यावेळी माजी सभापती रघुनाथ कथुरे, नारायण दारवटकर, पोलिस पाटील कैलास दारवटकर, संजय बोरगे, लालू दारवटकर, राजाभाऊ दारवटकर हे उपस्थित होते. खामगाव मावळ व थोपटेवाडी येथे सरपंच सतिश नवघणे, विनोद थोपटे, नाना नवघणे, सागर भोसले, बबलू थोपटे, लक्ष्मण दारवटकर, वसंत झरांडे, वाघू थोपटे, प्रशांत भोसले, पांडुरंग थोपटे, विनायक थोपटे, दशरथ थोपटे, संजय थोपटे यांनी स्वागत केले. मोठ्या संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.
पर्यटनाला संधी
या बसने येऊन पाब घाटाच्या पायथ्यापर्यंत ही बस जाते. मुख्य रस्ताने पाय चालत जाऊन पाबे घाटाच्या माथ्यावर चालत जात येईल. सिंहगड प्रमाणे या घाटात पायी चालण्याचा व्यायाम करण्यासारखा परिसर आहे. पावसाळ्यात या घाट परिसरात धबधबे, आढे आणि दरीचा परिसर असल्याने येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते.
बसची वेळ
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.