पुणे

स्वाइन फ्लूचा विळखा

जनार्दन दांडगे, उरुळी कांचन

पुणे - स्वाइन फ्लूने पुणे जिल्ह्यातही आपले रौद्ररूप दाखविण्यास सुरवात केली आहे. मागील महिनाभरात नऊ जणांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. इतर आजारांच्या तुलनेत अधिक संसर्गजन्य असलेल्या या आजाराचे जिल्ह्याच्या विविध भागांत मिळून २७ पेक्षा जास्त ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळून आले आहेत. हवेली तालुक्‍यातील एकट्या उरुळी कांचन गावातील दोन महिलांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याने खळबळ उडाली आहे. 

यंत्रणा सज्ज : डॉ. माने  
डॉ. दिलीप माने म्हणाले, ‘‘जिल्हाच्या विविध भागांत स्वाइन फ्लूचा झपाट्याने प्रसार होत आहे. मात्र, यापुढील काळात या आजाराचा प्रसार होऊ नये, म्हणून आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच, सर्वच शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅमी फ्लू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.’’

विषाणू संशोधन केंद्रांच्या माध्यमातून अकरा रुग्ण ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे आढळून आले, तर उर्वरित १६ रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रातील किटमुळे समजले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी या नात्याने चाकण, उरुळी कांचन, आंबळीसह इतर ठिकाणी भेट देऊन, हा संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
- डॉ. दिलीप माने, आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद

तालुकानिहाय रुग्णांची संख्या
हवेली (संशयित रुग्ण ७, मयत रुग्ण २), आंबेगाव (संशयित रुग्ण १, मयत १), बारामती (संशयित ३, मयत ०), दौंड (संशयित २, मयत ०), जुन्नर (संशयित १. मयत ०), खेड (संशयित ३, मयत १), मावळ (संशयित ३, मयत २), मुळशी (संशयित १, मयत १), पुरंदर (संशयित ३, मयत १), शिरूर (संशयित ३, मयत १).

स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेले रुग्ण  
प्रभावती वाल्मीक कांचन (वय ६०), सीमा चंद्रकांत येवारे (वय ४३, दोघीही रा. उरुळी कांचन, ता. हवेली), संपत तारू चोरगे (वय ४०, रा. गोनशेत, ता. मावळ), शंकर विठ्ठल कोकणे (वय ७२, रा. लाडेवाडी, ता. आंबेगाव), सूचना भीमराव कोली (वय ७५, रा. माण, ता. मुळशी), अनिल खंडेलवाल (वय ५८, रा. मंगेललाल चिक्की, लोणावळा, ता. मावळ), भारत शहाजी शिवले (वय ३३, रा. म्हाळुंगे इंगळे, ता. खेड), गणपत गंगाराम सुतार (वय ५७, रा. अंबोली ता. पुरंदर), आर्या स्वप्नील खंडागळे (वय ४ , रा. आपटी ता. शिरूर). 

पुणे शहरातील विविध शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये २७ संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील प्रभावती वाल्मीक कांचन यांचा गुरुवारी (ता. १३), तर सीमा चंद्रकांत येवारे यांचा आठ दिवसांपूर्वी स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण जिल्ह्याची माहिती घेतली असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. 

आरोग्य यंत्रणा सज्ज : डॉ. दिलीप माने. 
डॉ. दिलीप माने म्हणाले, ‘‘जिल्हाच्या विविध भागांत स्वाइन फ्लूचा झपाट्याने प्रसार होत आहे. मात्र, यापुढील काळात या आजाराचा प्रसार होऊ नये, म्हणून आरोग्य यंत्रणा सरसावली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आपापल्या हद्दीत खबरदारीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राबरोबरच, सर्वच शासकीय रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठी वापरण्यात येणाऱ्या टॅमी फ्लू औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.’’

लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय
सर्दी, खोकला, वारंवार शिंका, घशात खवखव, थंडी वाजून ताप, अंगदुखी ही ‘स्वाइन फ्लू’ची लक्षणे आहेत. या रुग्णाने त्वरित तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो. याची बाधा इतरांना होऊ नये म्हणून रुग्णाने एका खोलीतच आराम करणे, गर्दीत जाणे टाळणे, इतरांच्या संपर्कात न येणे, वारंवार हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे. हा रुग्ण केवळ स्वाइन फ्लूने दगावत नसून त्यामुळे फुफ्फुसावर होणारा घात व निमोनियामुळे त्याचा मृत्यू होतो. 

आजार कशामुळे होतो
स्वाइन फ्लू हा आजार श्‍वसन यंत्रणेशी संबंधित आहे. तो ‘एच१ एन१’ या अत्यंत घातक विषाणूंमुळे होतो. हवेच्या माध्यमातून या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे एका रुग्णापासून दुसऱ्याला या आजाराची लागण होते. तसेच या विषाणूंचा प्रसार रुग्णांच्या नाकातील व घशातील स्राव, त्याचा घाम, त्याच्या थुंकीमधून होतो. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे सज्ज असली, तरी नागरिकांनी खबरदारी घेतल्यास स्वाइन फ्लूचा धोका टाळता येऊ शकतो. स्वाइन फ्लूपासून वाचण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे गर्दीत जाताना मास्क अथवा रुमालाचा वापर करणे होय. यातूनही स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्यास आपआपल्या हद्दीतील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी.
- डॉ. सुचिता कदम (आरोग्य अधिकारी, उरुळी कांचन प्राथमिक आरोग्य केंद्र). 

संशयित रुग्णांचा हलगर्जीपणा
स्वाइन फ्लूचा प्रसार होण्यास रुग्णांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणांत कारणीभूत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने केला आहे. याबाबत बोलताना संबंधित अधिकारी म्हणाले, उरुळी कांचनमधील ज्या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे, त्या दोघींपैकी एकीला नगर जिल्हातील एका शहरात तर एकीला पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. अशा रुग्णाजवळ थांबणाऱ्यांनी अथवा संबंधित रुग्णास भेटायला जाणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घेण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Team India Squad T20 WC : संघाची घोषणा होण्याआधी मोठी अपडेट; टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार... पांड्याची जागा घेणार 'हा' खेळाडू?

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT