pune
pune  
पुणे

लोणी काळभोरमध्ये ‘स्वाइन फ्लू’ची प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मागिल कांही दिवसापासुन ‘स्वाइन फ्लू’चे संशयित रुग्न मोठ्या प्रमानात आढळुन आल्याने, 
खबरदारीचा उपाय म्हणुन चित्तरंजन गायकवाड मित्र मंडळ व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने नागरीकांना अंत्यत अल्प दरात प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची मोहीम सुरु केली आहे. कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयात पुढील आठ दिवस अल्प दरात लसीकरण चालु रहाणार आहे. 

नागरीकांना अल्प दरात लस मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड यांनी ग्रामपंचायतीला ‘स्वाइन फ्लू’ची प्रतिबंधात्मक लस खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांची रोख मदत दिली आहे. लसीकरणासाठी यापुढील काळात आनखी मदत लागल्यास, चित्तरंजन गायकवाड मित्र 
मंडळाच्या वतीने आनखी निधी पुरवण्यात येईल असे आश्वासन कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड यांनी स्पष्ठ केले. 

जिल्हा परीषदेच्या १४ व्या वित्त आयोगांतुन मंजुर झालेल्या विविध योजनांच्या माध्यमातुन महिलांना गृहउपयोगी वस्तूचे वाटप, वाहन प्रशिक्षण, अपंग लाभार्थीना अनुदानाचे वाटप अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन कदमवाकवस्ती ग्रामपंचायत कार्यालयात हवेलीचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (ता. 6) करण्यात आले होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात गौरी गायकवाड यांच्या हस्ते लसीकरम मोहीम सुरु करण्यात आली.  

याबाबत अधिक माहीती देताना सरपंच गौरी गायकवाड म्हणाल्या, कदमवाकवस्ती, लोणी काळभोरसह पुर्व हवेलीत मागिल दोन महिण्यापासुन ‘स्वाइन फ्लू’चे संशयित 
रुग्न मोठ्या प्रमानात आढळुन आले असुन, स्वाइन फ्लूमुळे सहाहुन अधिक जनांचा मृत्युही झालेला आहे. हा आजार पसरु नये यासाठी ‘स्वाइन फ्लू’ची प्रतिबंधात्मक लस 
घेण्याचे आवाहन जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाने केले आहे. मात्र ही लक्ष प्रतिव्यक्ती आठशे ते हजार रुपये खर्च येत असल्याने लस घेणे ही बाब सर्वसामन्य 
नागरीकांच्या आवाक्याबाहेरची ठरत होते. यातुन मार्ग काढण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन अंत्यत अल्प दरात लस देण्याचे काम सुरु केले आहे. चित्तरंजन गायकवाड यांनी पन्नास हजार रुपये दिले असुन, लसीकरणासाठी आनखी निधी देण्याची देण्याची तयारी दर्शवली आहे. 

यावेळी पंचायत समिती सदस्य अनिल टिळेकर, भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड,  बाळासाहेब भोसले, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच बाळासाहेब कदम, चित्तरंजन गायकवाड, जिल्हा परीषदेच्या आरोग्य केंद्रांचे वैदयकिय आधिकारी डॉ.दगडु जाधव, ग्रामविकास अधिकारी प्रवीण देसाई व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT