Take advantage of post office payment says MLA Sharad Sonawane
Take advantage of post office payment says MLA Sharad Sonawane 
पुणे

टपाल खात्याच्या पोस्ट पेमेंट बँक सुविधेचा लाभ घ्या : आमदार शरद सोनवणे 

दत्ता म्हसकर

जुन्नर : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या विविध सुविधा ग्रामीण भागातील नागरिक विशेषतः महिलांसाठी उपयुक्त असून या सेवेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आमदार शरद सोनवणे यांनी येथे केले.

जुन्नर येथील पोस्ट पेमेंट बँकेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्ष अलका फुलपगार, पोलिस निरीक्षक यशवंत नलवडे, माजी नगरसेवक मधुकर काजळे, उपविभागीय डाक निरीक्षक नेहा कुमारी, जुन्नर उपविभागाचे सहायक अधीक्षक एस. एस. जोशी, उपडाकपाल जयश्री जाधव, डी. एम. कोकणे तसेच नागरिक उपस्थित होते. जुन्नर उपविभागातील येणेरे, निरगुडे, खानापूर येथेही स्थानिक सरपंचाच्या उपस्थितीत या सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

सोनवणे म्हणाले, सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे टपाल खाते डिजिटलच्या जमान्यात मागे पडत चालले होते त्यास नवसंजीवनी देण्याचे काम पंतप्रधानांनी केले आहे. पोस्ट बँक सेवेच्या माध्यमातून हा जिव्हाळा पुन्हा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

यावेळी संतोष जोशी यांनी बँकेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. नलवडे, फुलपगार व काजळे यांची भाषणे झाली.मेघनाथ जाधव यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT