Water-Tanker
Water-Tanker 
पुणे

वाकडमध्ये टॅंकरलॉबी ‘पॉवरफूल’

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वाकड परिसरातील पाण्याचा प्रश्‍न अद्याप सुटला नसून या भागामध्ये पुन्हा एकदा टॅंकरलॉबी ‘पॉवरफूल’ झाली आहे. सोसायट्यांना पुरेसे पाणी देण्याबाबत महापालिकेने दिलेले आश्‍वासन फोल ठररल्याने नागरिक संतापले आहेत.

‘सध्या पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी सोसायट्यांना टॅंकरसाठी द्याव्या लागणाऱ्या रकमेची बिले फेब्रुवारी अखेरीस महापालिका आयुक्‍तांना देणार,’’ असल्याचे पिंपरी-चिंचवड हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी सांगितले. शहराला दररोज पाणीपुरवठा होत असताना सोसायट्यांना साडेतीन तास पाणी मिळत होते. एक दिवसाआड पाणीपुरवठा झाल्यानंतरही यावेळेमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. पाणीचा दाबही कमीच झाला आहे. त्यामुळे सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्‍या भरत नाहीत. पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी येथील सोसायट्यांना पुन्हा एकदा टॅंकर मागवावे लागत आहेत. टॅंकरचा खर्च वाढल्यामुळे सोसायटीच्या देखभाल खर्चातही वाढ करावी लागली आहे.

महापालिकेकडून वाकड भागात पाणीपुरवठा सुरळीत आहे. या भागातील सोसायट्यांना अडचण असल्यास तक्रार करावी. त्याची शहानिशा करून प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल. 
- मकरंद निकम, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT