Teacher-recruitment
Teacher-recruitment 
पुणे

#शिक्षकभरती शिक्षकभरतीच्या जाहिरातीची इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षाच

सकाळवृत्तसेवा

पुणे - शिक्षकभरतीच्या जाहिरातीसाठी इच्छुक उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ही जाहिरात सोमवारपर्यंत प्रसिद्ध होईल, असे यापूर्वी शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले होते; परंतु आता येत्या गुरुवारपर्यंत (ता.२८) ही जाहिरात प्रसिद्ध होईल, असे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

शिक्षकभरती तातडीने सुरू करावी, या मागणीसाठी संबंधित उमेदवारांनी फेब्रुवारीच्या सुरवातीला शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षण आयुक्तांनी २५ फेब्रुवारीपर्यंत भरतीची जाहिरात निघेल, असे आश्‍वासन दिले होते. त्या वेळी उमेदवारांनी उपोषण मागे घेतले. मात्र, अद्याप जाहिरात न निघाल्याने हे उमेदवार नाराजी व्यक्त करत आहेत. 

शिक्षकभरतीची प्रक्रिया शिक्षण विभाग, ग्रामविकास, समाजकल्याण आणि नगरविकास विभागाशी निगडित आहे. तसेच बिंदू नामावली पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.

गेली तब्बल नऊ वर्षे शिक्षकभरती झालेली नाही. मुख्यमंत्र्यांनी १८ हजार शिक्षकांची भरती पवित्र पोर्टलद्वारे होईल, असे काही महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. त्यामुळे शिक्षकभरतीसाठी किमान तेवढ्या किंवा त्यापेक्षा जास्त जागा निघणे अपेक्षित आहे.
- संतोष मगर, अध्यक्ष, डीटीएड आणि बी.एड. स्टुडंट असोसिएशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT