पुणे

दहा हजार तरुण-तरुणींनी नोंदविली मतदार यादीत नावे 

सकाळवृत्तसेवा

पुणे - आगामी निवडणुकीच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानाला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानात गेल्या दीड महिन्यात सुमारे 77 हजार जणांनी नोंदणी केली असून, त्यात 18 ते 19 वयोगटातील दहा हजारांहून अधिक तरुण-तरुणींचा समावेश आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून मतदार नोंदणी पुनःनिरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांचे अध्यक्ष आणि सचिवांना केंद्रस्तरीय मतदान स्वयंसेवक म्हणून नियुक्‍त करण्यात आले आहे. यासोबतच 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुण-तरुणींना मतदानाचा हक्‍क बजावता यावा, यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. 

गेल्या सप्टेंबरपासून आजअखेर सुमारे 77 हजार जणांनी मतदार यादीत नावे नोंदविली आहेत. त्यात सुमारे 60 हजार जणांनी ऑफलाइन, तर 17 हजार जणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यामध्ये दिव्यांगांची संख्या एक हजाराच्या जवळपास आहे. तर तीन तृतीय पंथीयांनीही त्यांची नावे नोंदविली आहेत. 

रविवारी विशेष मोहीम 
21 ऑक्‍टोबर आणि 28 ऑक्‍टोबर 2018 रोजी मतदान केंद्रांवर सकाळी 9 ते सायंकाळी पाचपर्यंत अर्ज वितरीत आणि जमा करण्यात येतील. अर्जासोबत छायाचित्र, वय आणि पत्त्याच्या पुराव्याची झेरॉक्‍स प्रत द्यावी लागेल. 

ऑनलाइन नोंदणीसाठी 
www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाइन नावनोंदणी करता येईल. अर्जासोबत छायाचित्र, वयाचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा जोडावा लागणार आहे. वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, गुणपत्रिका, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहन परवाना किंवा आधारकार्ड स्कॅन करून जोडता येईल. तर पत्त्याचा पुरावा म्हणून पासपोर्ट, वाहन परवाना, बॅंक पासबुक, रेशनकार्ड, भाडेकरारपत्र, पाणीबिल, वीजबिल, टेलिफोनबिल किंवा गॅस कनेक्‍शन कार्डची प्रत जोडता येईल. 

मतदार यादीत नावनोंदणीसाठी 31 ऑक्‍टोबर शेवटची तारीख आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुण-तरुणींनी मतदार यादीत नावे नोंदवावीत. मतदारांनी त्यांचे नाव यादीत असल्याची खात्री करून घ्यावी. त्यामुळे ऐन मतदानाच्या दिवशी धावपळ होणार नाही. 
- मोनिका सिंह, उपजिल्हा निवडणूक अधिकारी 

मतदानाचा हक्‍क बजाविण्यासाठी मतदार यादीत ऑनलाइन नाव नोंदविले आहे. आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणे हा माझ्यासाठी वेगळा अनुभव असेल. 
- ऋतुजा, विद्यार्थिनी, प्रथम वर्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT