leopard
leopard 
पुणे

बारामतीतही बिबट्याची दहशत 

संतोष अटोळे

शिर्सुफळ (पुणे) : कटफळ (ता. बारामती) परिसरातील औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या बाऊली कंपनीच्या परिसरात सोमवारी (ता. 9) पहाटे बिबट्या कंपनीच्या सीसीटीव्हीमध्ये आढळला. त्यामुळे सर्वत्र घबराट पसरली. 

बिबट्यासदृश प्राणी कंपनीत घुसल्याच्या भीतीमुळे कंपनीचे अधिकारी व कर्मचारीही भीतीनेच आपल्या केबिनमध्येच बसून राहिले. दरम्यान पाच वाजता वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कंपनीचा संपूर्ण परिसरात शोध घेतला. मात्र, काहीही आढळून आले नाही. यावरून तो तेथून पसार झाला असावा, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. तसेच, कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता व पायाच्या ठशांवरून तो बिबट्या असल्याचे वन विभागाने सांगितले. कंपनीच्या मागील बाजूने तो निघून गेल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. 
दरम्यान, बारामतीच्या पट्ट्यात बिबट्या आढळल्याने परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत वन विभागाने संबंधित भागातील ग्रामस्थांनी समूहाने राहत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

""बारामती औद्योगिक वसाहत परिसरात बाऊली कंपनीत वाघ शिरल्याची सोमवारी पहाटेपासून चर्चा होती. याबाबत पहाटे पाच वाजता वन विभागाने कंपनीत पाहणी केली. त्यावेळी संबंधित प्राणी पसार झाला होता. या वेळी कंपनीच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता तो प्राणी वाघ नसून बिबट्या असल्याचे दिसले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. एकट्याने न फिरता समूहाने वावरावे,'' असे आवाहन बारामती वन विभागाचे वनपाल त्रिंबक जराड यांनी केले. 
 

बारामती औद्योगिक क्षेत्रातील गजबजलेल्या भागात बिबट्याचा वावर हा मानवाने वनक्षेत्रात केलेल्या घुसखोरीचे परिणाम आहेत. बिबट्यापासून आपल्याला सावधानता आणली पाहिजे, नाहीतर आपल्यावर हल्ला होऊ शकतो. यासाठी काठीला घुंगरू बांधून उसाला व इतर पिकांना पाणी देणे किंवा एकत्रितपणे पाणी देणे. समूहाने राहणे. एवढी काळजी सर्वांना घ्यावी लागेल. वन्यजीव व मानव संघर्ष अटळ आहे. 
- डॉ. महेश गायकवाड, 
प्राणिमित्र 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT