TET-Exam
TET-Exam Sakal
पुणे

TET गैरप्रकाराने पात्र उमेदवारांनी माफीचे साक्षीदार व्हावं अन्यथा...; पोलिसांचा इशारा

सकाळ डिजिटल टीम

शिक्षक पात्रता परिषेद तब्बल ९३०० उमेदवार गुणवाढीसाठी पैसे देऊन पात्र ठरल्याचं पोलिसांना आढळून आलं आहे.

पुणे - शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी वरिष्ठ अधिकारी, परीक्षेची जबाबदारी असणाऱ्या खासगी कंपनीचे अधिकारी, दलालांवर आत्तापर्यंत कारवाई केलेल्या पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांच्या पथकाने आता अपात्र असतानाही पैसे देऊन गुणवाढ करीत पात्र ठरलेल्या उमेदवारांवर लक्ष्य केंद्रीत केले आहे. संबंधीत उमेदवारांनी माफीचे साक्षीदार होऊन पोलिसांना सहकार्य करावे, अन्यथा पोलिसांकडून कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी संबंधीत उमेदवारांना दिला आहे.

राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 2018 व 2019-20 या कालावधीत घेतलेल्या "टीईटी' परीक्षेतील तब्बल साडे तानी लाख पेपरची पोलिसांनी छाननी केली. त्यामध्ये 9 हजार 300 हून अधिक उमेदवार गुणवाढीसाठी पैसे देऊन पात्र झाल्याचे पुणे सायबर पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये पुढे आले आहे. 2018 या वर्षीच्या "टीईटी'मध्ये किती जण गैरमार्गाने परीक्षा पात्र झाले, याबाबतची तपासणी अजूनही सायबर पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या दोन्ही शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये मोठ्या संख्येने उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे उघड झाले. त्याबाबत संबंधित उमेदवारांची यादीही सायबर पोलिसांनी शिक्षण विभागाला दिली आहे. या गैरप्रकारामध्ये सहभागी झालेल्या सर्व उमेदवारांना सायबर पोलिसांनी पोलिसांना सहकार्य करण्याचे, माफीचा साक्षीदार होण्याचे आवाहन केले आहे. संबंधीत उमेदवारांनी पोलिसांना या गैरव्यवहाराच्या तपासामध्ये योग्य प्रकारे सहकार्य न केल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT