पुणे

जुन्नर येथे महिलेने दिला तीळ्यांना जन्म

सिद्धार्थ कसबे

पिंपळवंडी : हिवरे खुर्द (ता. जुन्नर) येथील ज्योत्सना विठ्ठल वायकर(वय३४) या महिलेने चौदा नंबर (ता. जुन्नर) येथील श्री रुग्णालयात सोमवारी (ता. २१) सकाळी तीळ्या बाळांना जन्म दिला असून, बालके व माता सुखरूप असल्याची माहिती श्री हॉस्पिटलचे डॉ. अविनाश पोथरकर यांनी दिली. यापूर्वीही ज्योत्सना वायकर यांनी पाच वर्षांपुर्वी जुळ्या बाळांना जन्म दिला होता. त्यानंतर त्यांना पुन्हा मुल होऊ शकत नाही असे डॉक्टरांनी सांगितल्या नंतर त्यांनी चौदा नंबर येथील श्री.हॉस्पिटलच्या डाॅ.मुक्तांजली पोथरकर व डॉ. अविनाश पोथरकर यांच्याकडे होमिओपॅथीचे उपचार सुरु केले. ज्योत्स्ना वायकर यांना बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांनी तीन बाळांना जन्म दिला. त्यांना चार मिनिटांच्या अंतरात एक मुलगी व दोन मुलगे झाले.

यात मोठ्या मुलाचं वजन अडीज किलो,मुलीच वजन दोन किलो तीनशे ग्राम व तिसऱ्या मुलाचं वजन दोन किलो दोनशे ग्राम आहे. डॉ. पोथरकर यांच्या सोबतच जुन्नर येथील शिंगोटे हॉस्पिटलचे स्त्री रोग तज्ञ डाॅ. प्रसाद शिंगोटे, ज्योती मुळे, भुलतज्ञ डाॅ.मोनाली शिंगोटे व आळेफाटा येथील बालरोग तज्ञ डाॅ.सतीश कजबे यांनी विशेष काळजी घेतली.

होमिओपॅथीचे उपचार घेतल्याने वंध्यत्व निवारण होऊ शकते. आई व तिन्ही जन्मजात बालके हि सुखरूप असुन यासाठी तज्ञ डॉक्टरांचे सहकार्य लाभले. वैद्यकीय क्षेत्रातील हि एक दुर्मिळ घटना आहे.

-डॉ.अविनाश पोथरकर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT