Theft
Theft 
पुणे

गडगंज राजकारणी निघाला भुरटा चोर

सकाळवृत्तसेवा

पुणे - लातूरमध्ये भला मोठा बंगला... ‘पाच हजार रुपयांची थाळी’ असलेले मुंढव्यात नामांकित हॉटेल... अहो, एवढंच नाही, तर लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणूक रिंगणात उतरलेला उमेदवार चक्क भुरटा चोर निघाला. पुण्यात गेले सहा महिने सोनसाखळी चोरी व पर्स चोरीचा धुमाकूळ घालणारा हाच तो. चोरीच्या पैशांतून हॉटेल व्यवसायात जम बसविण्याचे त्याचे स्वप्न गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने धुळीस मिळविले. 

राजू खेमू राठोड ऊर्फ राजाभाऊ खेमराज राठोड (वय ३४, सध्या रा. मुंढवा, मूळ एकंबी लमाण तांडा, उजनी, लातूर) असे या चोरट्याचे नाव आहे. तर शंकरराव ऊर्फ शिवा रामदास बिरादार (वय ३४, रा. लोणी काळभोर, मूळ. रा. हैदराबाद) असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. २००४ ते २००९ या काळात पुण्यात बिगारी काम करणाऱ्या राजूने हळूहळू प्रगती करत जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायापर्यंत मजल मारली. तरीही चैनीसाठी पैसे पुरत नसल्याने त्याने लातूरमध्ये चोरी सुरू केली. याच पैशातून तेथे बंगला खरेदी केला. त्यानंतर एका प्रस्थापित राजकीय पक्षाकडून लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्याचाही प्रयत्न केला. चोरीच्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना त्याची शिवाबरोबर ओळख झाली आणि त्यांनी आपला मोर्चा पुण्याकडे वळविला.

हेल्मेट घालून दोघेही पहाटे स्वारगेट, पुणे स्टेशन, डेक्कन, कोथरूड, वारजे परिसरात प्रवासी, फिरायला आलेल्या महिला, नागरिकांच्या सोनसाखळी, पर्स चोरी करत होते. या स्वरूपाचे १०० हून अधिक गुन्हे दोघांनी केले.

दरम्यान, चोरीच्या १५ लाखांतून मुंढवा येथे नंदिनी नावाचे हॉटेल सुरू करून हॉटेल व्यवसायात स्थिर होण्याचा प्रयत्न होता. पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण व त्यांच्या पथकाने त्यांना अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त प्रदीप देशपांडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलिस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT