thief
thief 
पुणे

कानगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ 

अमर परदेशी

वरवंड (पुणे) : दौंड तालुक्यातील कानगाव येथे गुरुवारी (ता. 31) मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. येथील एका शेतकऱ्याच्या कांद्याच्या पैशावर चोरट्यांनी घरात शिरून डल्ला मारला. तर, दुसऱ्या घरात स्वयंपाकघराच्या खिडकीतून प्रवेश करून कपाटातील दीड लाख रुपये रोख, सोन्याचे दागिने, असे एकूण दोन लाख अठरा हजार रुपयांची चोरी करून पोबारा केला. तसेच, परिसरात इतर दोन ठिकाणीही घरफोडीचा प्रयत्न झाला. 

याबाबत सुनीता संदीप ससाणे (रा. कानगाव) यांनी पाटस पोलिस चौकीत फिर्याद दिली. त्यानुसार हवालदार बाळासाहेब पानसरे यांनी माहिती दिली की, कानगाव परिसरातील जोशीवाडा भागात भर लोकवस्तीत ससाणे यांचे घर आहे. ते कामानिमित्त गुरुवारी पुण्याला गेले होते. त्यांच्या पत्नी सुनीता या मुले व सासूसमवेत घरी होत्या. रात्री कामे उरकून त्या झोपी गेल्या. सुनीता या मुलांना घेऊन एका खोलीत; तर सासू दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या.

मध्यरात्री दोन वाजता स्वयंपाक खोलीच्या खिडकीतून एका चोरट्याने खोलीत प्रवेश केला. त्याने दुसऱ्या खोलीत जाऊन कपाट उघडून आतील कपडे फेकून दिले. त्या वेळी एका डब्यातील रोख दीड लाख रुपये, सोन्याचे अडीच तोळ्यांचे; तर चांदीचे काही दागिने, असा एकूण दोन लाख अठरा हजार रुपयांचा ऐवज चोरला.

या वेळी सुनीता यांच्या सासूला आवाजाने जाग आली. त्यांनी सुनीता यांना हाक मारून, "कसला आवाज येतोय?' असे विचारले. त्यावर सुनीता यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले. त्या वेळी एक अज्ञात व्यक्ती त्यांना घरात दिसला. त्यामुळे त्या ओरडल्या. त्या वेळी चोरट्याने घराचा दरवाजा उघडून हातातील ऐवज घेऊन पळ काढला. सुनीता यांनी धाडसाने घराबाहेरपर्यंत पाठलाग केला, पण चोरटा अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. परिसरातील लोकांनी आवाज ऐकून ससाणे यांच्या घराकडे धाव घेतली. गावात इतर दोन ठिकाणीही घरफोडीचा प्रकार घडला. 

याबाबतची माहिती मिळताच यवत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलिस उपनिरीक्षक रामभाऊ घाडगे, पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ वाघमोडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घाडगे करीत आहेत. या प्रकरणी आम्ही ठोस पावले उचलले आहे. तपासासाठी स्वतंत्र पोलिस पथक करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक पाटील यांनी दिली. 

दरम्यान, ससाणे यांनी काही दिवसांपूर्वी कांदा विकला होता. दिवाळीसाठी ही रक्कम व दागिने घरात होती. मात्र, चोरट्यांनी मोठ्या सफाईने हात साफ केले. त्यामुळे लोकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT