shiesufal
shiesufal 
पुणे

सोनबा पाटील वस्तीला रस्ता न मिळाल्याने तिसऱ्या पिढीचे उपोषण

संतोष आटोळे

शिर्सुफळ - दोन पिढ्यांनंतरही वस्तीला जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याने तिसऱ्या पिढीवर उपोषण करण्याची वेळ बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील सोनबा पाटील वस्तींवरील तरुणांनी आली आहे. यामुळे तिसऱ्या पिढीला तरी हक्काचा रस्ता मिळावा एवढीच अपेक्षा उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली.यामुळे शालेय मुलांसह ग्रामस्थांची रस्त्याविना होणारी हेळसांड दुर होईल. दरम्यान गावातील इतर ग्रामस्थही उपोषणस्थळी भेट देवुन पाठींबा देत आहेत. 

याबाबत अधिक माहिती अशी कि शिर्सुफळ ग्रामपंचायत अंतर्गत येणारे सोनबा पाटील वस्ती स्वातंत्रपूर्व कालखंडापासुन गावाच्या पश्चिमेला अस्तित्वात आहे. त्यानंतर दौंड बारामती रेल्वे लाईन आली आणि वस्ती गावापासुन वेगळी झाली. तेव्हापासुन लोक कधी रेल्वे लाईनवरुन तर कधी चिखल काटे तुडवत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावाशी संपर्क ठेवत होते.

आता तर गेल्या काही वर्षापासुन केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे रेल्वे मार्गावरील सर्व अनाधिकृत मार्ग बंद करण्यात आले. या मुळे रेल्वे लाइन पासून पश्चिमेला राहणारे सर्व रहिवाशी व या भागात शेती असणारे शेतकरी यांना शेतामध्ये, घरी दैनंदिन कामकाजासाठी व मुलांना शाळेमध्ये जाने येणे साठी रस्ता अस्तित्वात राहिला नाही यामुळे गावाशी संपर्क तुटत आहे.

सोनबा पाटील वस्ती ते गाव हे अंतर सर्वसाधारण 2 कि मी च्या आसपास आहे मात्र गावात येण्यासाठी उलट्या दिशेने दौंड तालुक्यातील भोळोबावाडी वरून शिर्सुफळ गावात यावे लागते हे अंतर 7 ते 8 कि मी भरते आशा वेळेस वयस्कर नागरिक, आजारी रुग्ण यांना दवाखान्यात आणणे तसेच शालेय विद्यार्थी यांना हे अडचणीचे ठरते.

यावर धवडे गावडे वस्ती पासून गट नं 70 व गट नं 146 यांच्या सर्वे नं बांधावरून प्रशमशासनाने रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षापासुन करण्यात येत आहे.याकडे दुर्लक्ष झाल्याने उपोषण करण्याची वेळ आल्याचे सांगितले जात आहे. 

रस्ता होईपर्यंत उपोषण न सोडण्याचा इशारा..
याबाबत उपोषणकर्ते म्हणाले की आम्ही आमच्या पणजोबापासुन हक्काचा रस्त्यापासून वंचित आहोत.यामुळे आमचे आजोबा, वडील हे शिक्षणासह इतर सुविधांपासुन वंचित राहिले. यामुळे आता आमच्या मुलांना तरी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासनाला अनेक वेळा निवेदने दिली विनंत्या केल्या मात्र रस्ता मिळाला नाही यामुळे आम्ही सनदशीर मार्गाने उपोषणाचा मार्ग स्विकारला आहे.जो पर्यत रस्ता खुला करुन दिला जात नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT