aadil 1.jpg
aadil 1.jpg 
पुणे

देव तारी त्याला कोण मारी : बाल्कनीतून 'तो' खाली पडला अन्...

संदीप जगदाळे

हडपसर (पुणे) : देव तारी त्याला कोण मारी असं म्हणतात ते काही खोटं नाही. या उक्तीचा प्रत्यय रामटेकडीमध्ये आला. रामटेकडी येथील आनंदनगर मधील आदिल वसीम शेख हा तीन वर्षाचा चिमुरडा घराच्या बाल्कनीतून २० फूट खाली पडला. मात्र, नशिब बलवत्तर होते म्हणून तो सुखरूप बचावला.
आदिल घरात खेळत होता. नजर चुकवून तो खेळत खेळत घराच्या बाल्कनीमध्ये गेला. बाल्कनीमध्ये एक खुर्ची होती. त्यावर तो चढला. घराबाहेर पाउस पडत होता. तो खुर्चीवर उभा राहिला व पावसाच्या पाण्याशी खेळून लागला. दुर्देवाने त्याचा तोल गेला व तो खाली पडला.

मोठा आवाज आल्याने शेजारील लोक व आई घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना आदिल गॅलरीतून खाली पडल्याचे निदर्शनास आले. ते चित्र पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. काही काळ आदिल बेशुध्द अवस्थेत होता. त्यामुळे त्याची आई खूप घाबरली. ती मोठयाने रडू लागली. मदतीसाठी लोकांना याचना करू लागली. तातडीने शेजारच्या मदतीने आईने त्याला दवाखान्यात नेले. त्यावेळी तो शुध्दीवर आला. डॅाक्टरांनी तपासणी केली असता तो सुखरूप असल्याचे डॅाक्टरांनी सांगितले. त्यामुळे त्याच्या आईने सुटकेचा निश्वास सोडला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा


आदिलची आई हसीना शेख सकाळशी बोलताना म्हणाल्या,  मी देवाची खूप ऋणी आहे. काळाने आदिलवर झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण त्यातून तो सुखरूप निसटला आणि इतक्या उंचीवरून तो खाली पडूनसुध्दा बचालला. घरात मी भांडी घासत होते. तेव्हा आदिल माझ्या नकळत बाल्कनीत गेला. माझे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडली. त्यामुळे लहान मुलांना बाल्कनीत एकटयाला खेळण्यास सोडू नये, अशी विनंती सर्वांना करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket Team : जिंकलेत आयर्लंडविरूद्ध अन् म्हणे पाकिस्तान जगातील सर्वोत्तम संघ... PCB च्या नक्वींनी कळसच गाठला

Pune Traffic : मेट्रोच्या कामामुळे सिमला ऑफिस चौकाजवळ वाहतुकीत बदल

PM Modi Mumbai roadshow : ''जुने रेकॉर्ड तोडणार'' मोदींच्या मुंबईतील 'रोड शो'ला तुफान प्रतिसाद; पंतप्रधान म्हणाले...

IPL 2024 RR vs PBKS Live Score: पंजाबचा अर्धा संघ परतला माघारी! चहलने तोडली जितेश शर्मा-सॅम करनची पार्टनरशीप

Pune Crime News : महादेव ॲपद्वारे ऑनलाइन सट्टा चालविणाऱ्या कॉल सेंटरवर छापा

SCROLL FOR NEXT