Til
Til 
पुणे

तिळाच्या दरामध्ये तेजी

सकाळवृत्तसेवा

पुणे - गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात तिळाचे उत्पादन सुमारे ६० टक्‍क्‍यांनी घटले आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत तिळाच्या भावात किलोमागे ४० ते ५० रुपयांनी वाढ झाली आहे.  कच्च्या तिळाला प्रतिकिलोस १४० ते १५० रुपये, तर स्वच्छ तिळास (वॉश केलेले) १६५ ते १७० रुपये भाव मिळत आहे. 

देशात गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांत प्रामुख्याने तिळाचे उत्पादन घेतले जाते. देशांतर्गत तिळाची गरज साडेचार लाख मेट्रिक टन इतकी असून, गेल्या वर्षी देशांतंर्गत गरज भागेल, एवढे तिळाचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र सुमारे १ लाख ७७ हजार मेट्रिक टन उत्पादन झाले असून, पुढील वर्षी मे अखेरपर्यंत बाजारात येणाऱ्या उन्हाळी तिळाचे उत्पादन साधारण ७० हजार मेट्रिक टन इतके राहण्याचा अंदाज आहे. उत्पादन घटल्याने कच्च्या तिळाच्या दरात ही भाववाढ झाली आहे. गेल्या वर्षी तिळाचे भाव किलोस १०० ते ११० रुपयांपर्यंत होते, अशी माहिती मार्केट यार्डतील तिळाचे व्यापारी रमेश पटेल यांनी दिली.

जगात सुदान, युगांडा, इथिओपिया, टांझानिया, नायजेरिया या आफ्रिकन देशांसह हिंदुस्तान, चीन, पाकिस्तान आणि कोरिया देशांत तिळाचे उत्पादन घेतले जाते. गेल्या वर्षी जगभरात तिळाचे उत्पादन २१ लाख मेट्रिक टन इतके झाले होते. चालू वर्षी त्यामध्ये वाढ होऊन २४ लाख ७७ हजार मेट्रिक टन इतके झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात देशातील तीळ उत्पादनात झालेली घट समोर आल्यानंतर बाजारात तिळाचे किलोचे भाव १६५ ते १७० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र जगभरातील तीळ उत्पादनवाढीची आकडेवारी जाहीर होताच तिळाच्या भावात घट होऊन ते १४० ते १५० रुपयांवर होते. मात्र आता देशांतर्गत उत्पादन घटल्याने पुन्हा हे दर वाढले आहेत.

भाववाढीमुळे खप घटला
परदेशातून तिळाची आयात केली जाते. आयात तिळावर प्रक्रिया करून त्याची निर्यात केली जाते. यंदा देशांतर्गत तिळाचे उत्पादन घटले आहे. उन्हाळी तिळाच्या उत्पादनाची परिस्थिती मे महिन्यात समोर येणार असली, तरी दुष्काळामुळे उत्पादन वाढण्याची शक्‍यता कमी आहे. उत्पादन घटल्याने तिळाच्या खपावर परिणाम सुरू झाला आहे, असे व्यापारी अजित बोरा यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT