पुणे

डिजिटल तज्ज्ञांकडून तरुणाईला टिप्स

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - डिजिटल युगात तुम्हाला लेखन करायचे असेल तर त्यासाठी तुम्ही कसा विचार करायला हवा, कोणत्याही क्षेत्रात यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या मार्केटिंगसाठी हे तंत्र कसे उपयोगात आणाल, ई-कॉमर्सचा वापर करताना कोणते तंत्रज्ञान उत्तम आहे इथपासून ते आजच्या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय कराल, याच्या टिप्स देत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी तरुणांशी संवाद साधला. निमित्त होते ‘सकाळ’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आयोजित करण्यात आलेल्या ‘यिन टॉक’ कार्यशाळेतील ‘डिजिटल थिंकिंग’ कार्यक्रमाचे.

आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्‍चर अँड डिझाइनमध्ये गुरुवारी (ता. २९) ही कार्यशाळा झाली. अभिनेते- लेखक आणि दिग्दर्शक ध्रुव सहगल, डिजिटल तज्ज्ञ अमित जाधव, शॉप्टिमाइजचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश पंडितराव, किलोबीटर्सच्या सहसंस्थापिका श्‍यामा मेनन, आय व्हॉलेंटियर कंपनीचे संस्थापक शरद सहाय यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. या वेळी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या संचालिका मृणाल पवार, इव्हेंट विभागाचे वरिष्ठ सरव्यवस्थापक राकेश मल्होत्रा, सहप्रायोजक विवेक बिडगर, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे कार्यकारी संचालक गिरीश देसाई उपस्थित होते. या वेळी तरुणांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

वेबसाठी लिखाण या विषयावर मार्गदर्शन करताना सहगल म्हणाले, ‘‘प्रत्येकाच्या डोक्‍यात एखादी गोष्ट असते, त्याची मांडणी आकर्षक कशी होईल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे.’’ कथा लिहिताना कोणत्या बाबींचा विचार करणे अपेक्षित आहे, हे त्यांनी उदाहरणासह सांगितले. कथेचे लिखाण करताना त्यात नाते, भूतकाळ, स्वप्न यांचा विचार करताना ती रंजक कशी होईल, याचा विचार प्रत्येकाने करावा, असेही ते म्हणाले. 

उद्योजकांसाठी डिजिटल मार्केटिंग यावर जाधव म्हणाले, ‘‘आजच्या जमान्यात मोबाईल, ई-कॉमर्स, नॅनो टेक्‍नॉलॉजी, ऑनलाइन, सोशल मीडिया याला सर्वाधिक महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने याचा वापर प्रभावीपणे करण्याची गरज आहे. पूर्वी दूरदर्शनची सुरवात व्हायची, त्यावेळेस वाजणारे गाणे सहा सेकंद चालायचे. आता इतक्‍या वेळात लोक चॅनेल बदलतात. भारतात ४६ कोटी २० लाख लोक इंटरनेटला जोडलेले आहेत. त्यापैकी ३८ कोटी ६० लाख लोक इंटरनेटचा वापर मोबाईलवर करतात. ब्लॉग, फेसबुक, लिंक्डइन, इन्स्टाग्राम, ट्‌विटर, याचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे इथून पुढल्या काळात तुम्हाला फक्‍त शैक्षणिक प्रमाणपत्रावर नोकरी मिळणार नाही, त्यासाठी तुमच्याकडे तंत्रज्ञानाचे उत्तम ज्ञान असणे आवश्‍यक आहे.’’ 

ऑनलाइन खरेदीसाठी वापरण्यात येणारे तंत्रज्ञान, ई-कॉमर्स टेक्‍नॉलॉजी याची माहिती देताना त्यात होणारे बदल, नवीन आव्हाने याची माहिती पंडितराव यांनी दिली.  

डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत असताना आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे, त्यासाठी कोणते तंत्र विकसित करण्यात आले आहे, खास करून युवा वर्गाला त्याचा कसा फायदा होऊ शकतो, हे मेनन  यांनी पटवून दिले. 

डिजिटल युगातील सामाजिक बांधिलकी यावर बोलताना सहाय म्हणाले, ‘‘डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रमाण सतत वाढत आहे, त्यामुळे या माध्यमाचा वापर करणाऱ्या प्रत्येकाने त्यामध्ये येणाऱ्या भविष्यातील आव्हानांचा विचार करण्याची आवश्‍यकता आहे.’’  या कार्यक्रमाचे सहप्रायोजक विवेक बिडगर असोसिएट्‌स व उत्सव होम्स हे असून  स्थळ प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हे होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT