Tamasha Artist
Tamasha Artist Sakal Digital
पुणे

जत्रांमध्ये पुन्हा रंगू लागले तमाशाचे फड; धामणी येथील खंडोबाची यात्रा उत्साहात

सकाळ वृत्तसेवा

पारगाव, ता. २५ : कोरोनामुळे सुमारे दोन वर्षानंतर राज्यात एक फेब्रुवारीपासून तमाशाच्या जाहीर कार्यक्रमांना परवानगी मिळाली आहे. यामुळे तमाशाचे कार्यक्रम पुन्हा सुरु झाले आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धामणी (ता. आंबेगाव) येथील खंडोबाच्या यात्रेत दोन वर्षाच्या कालखंडानंतर तमाशाचा फड रंगला. ढोलकीचा तालावर लावणीच्या ठेक्यावर नृत्यागणांनी सादर केलेला मुजरा कलाविष्कार पाहण्यासाठी परिसरातील तमाशा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

गावच्या यात्रेला तमाशा शिवाय शोभा येत नाही. त्यामुळे गावची यात्रा आली की, गाव कारभारी काही महिने अगोदरच तमाशाचे बुकिंग करत असतात. मागील दोन वर्षात कोरोनामुळे सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा बंद होत्या. त्यामुळे तमाशांना मागणीच नव्हती. त्यामुळे तमाशा कलावंतांचे मोठे नुकसान झाले होते. काहींची उपासमार झाली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात एक फेब्रुवारीपासून तमाशाचा परवानगी मिळाली.
पुणे जिल्ह्यात यात्रा उत्सवाला आता सुरुवात झाली आहे. नुकतीच धामणी येथील खंडोबाची यात्रा झाली. तमाशाला परवानगी मिळाल्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यातील ही पहिलीच यात्रा होती. येथील यात्रेतील दोन दिवस तमाशाचे कार्यक्रम होत असतात. या यात्रेत तमाशाचे मोठे आकर्षण असते. हंगामातील ही पहिलीच यात्रा असल्याने या यात्रेतील तमाशा पाहण्यासाठी तालुक्यातून तमाशा शौकीन येत असतात. यावर्षी पहिल्या दिवशी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा व दुसऱ्या दिवशी मंगला बनसोडे सह नितीनकुमार बनसोडे करवडीकर यांच्या तमाशाचा कार्यक्रम झाला. दोन्ही दिवसाच्या तमाशाचे कार्यक्रम पाहण्यासाठी तमाशा शौकिनांनी तोबा गर्दी केली होती.


कोरोनोचा मोठा फटका तमाशा कलावंताना बसला. गेल्या दोन वर्षांपासून तमाशा बंद असल्याने प्रचंड नुकसान झाले. काही कलावंताची उपासमार झाली. तमाशा फडांचे साहित्य, सजावटीचे कपडे खराब झाले. वाहने ही जाग्यावर उभी असल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, आता तमाशाला परवानगी दिल्याने आम्ही सरकारचे आभार मानतो. तमाशा पुन्हा सुरु करताना फडमालकांनी लाखों रुपयांचे कर्ज काढले आहे. सरकारने तमाशासाठी लवकरात लवकर पॅकेज जाहीर करावे.
-मंगला बनसोडे, तमाशा मालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT