Pipeline
Pipeline Sakal
पुणे

जळगावमध्ये पाइपलाइनच्या कामास प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

मोरगाव - जळगाव क.प. (ता. बारामती) येथील शंभर टक्के शेतकऱ्यांना पुरंदर योजनेच्या पाण्याचा लाभ मिळावा यासाठी येथील शेतकऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. शेवटी पवार यांच्या सूचनेनुसार येथील वाढीव पाइपलाइनच्या कामास मंजुरी मिळाली. त्याच्या कामाचा नुकताच प्रारंभ करण्यात आला.
पुरंदर योजना बारामतीच्या जिरायती भागातील शेतकऱ्यांना शाश्वत शेतीसिंचनासाठी वरदान आहे. या योजनेसाठी पुणे जलसंपदा विभागाकडून ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याची माहिती पुरंदर उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता मोहन कांबळे यांनी दिली. ही पीव्हीसी आठ इंच अशी असून यामुळे जळगाव गावाच्या ज्या हद्दीत पुरंदर योजनेचे पाणी जात नव्हते. तिथे पाणी सहजपणे पोचण्यास मदत होणार आहे. ही पाइपलाइन मंजूर व्हावी यासाठी बारामती जिरायती भाग पाणी परिषदेचे निवृत्ती ताम्हाणे, विकास शेळके बजरंग वाबळे यांनी विशेष पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केला होता.
पाइपलाइनच्या कामाचा प्रारंभ करताना बारामती राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे उपविभागीय अधिकारी रंगनाथ भुजबळ, शाखा अभियंता मोहन कांबळे, बारामती पंचायत समितीचे सदस्य राहुल भापकर, बजरंग वाबळे महेश वाबळे, विकास शेळके, निवृत्ती ताम्हाणे, दिगंबर सूर्यवंशी व शेतकरी उपस्थित होते.

वाढीव पाइपलाइनचे काम सुमारे साडे चार किलोमीटरवर असून यामुळे अनेक शेतकऱ्यांना शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध होणार आहे. पुरंदर योजना शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आर्थिक उत्पन्न वाढवावे
- संभाजी होळकर, तालुकाध्यक्ष, बारामती राष्ट्रवादी कॉंग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT