पुणे

विजयस्तंभ परिसराचे रूप पालटणार

CD

कोरेगाव भीमा, ता. १ : ‘‘शौर्याचे प्रतीक असलेल्या कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाचा इतिहास त्यागाचा आणि पराक्रमाचा असून, येथील परिसराच्या सर्वांगिण विकासाचा निर्णय घेत राज्य सरकारने त्यासाठी उच्चस्तरीय व स्थानिक अधिकाऱ्यांच्या योग्य समन्वयाने शासकीय समितीही स्थापन केली असून, विजयस्तंभाबरोबरच वढू-तुळापूरच्याही परिसर विकासाचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे या संपूर्ण परिसराचे चित्र पालटणार आहे,’’ असा विश्‍वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.

कोरेगाव भीमाजवळ असलेल्या पेरणे फाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभस्थळी अभिवादन दिनानिमित्त शनिवारी (ता. १) सकाळीच उपमुख्यमंत्री पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्यासमवेत भेट देत मानवंदना व अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, माजी आमदार प्रकाश गजभिये व जयदेव गायकवाड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बार्टी व समाजकल्याण विभागाच्यावतीने समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी पवार, मुंडे व बनसोडे यांचा विजयस्तंभाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देवून सन्मान केला.
यावेळी अजित पवार म्हणाले, ‘‘कोरेगाव भीमा येथील सन १८१८च्या लढाईतील शुरवीरांचा शौर्य व पराक्रमाचा इतिहास पुढील पिढीला माहीत व्हावा, यासाठी या परिसराचा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री मुंडे यांच्या पुढाकारातून सर्वांगिण विकास करण्यासाठी परिपूर्ण आराखडा तयार करण्याचे काम सुरु केले आहे. तसेच, कोरेगाव भीमा व वढू-तुळापूरच्या विकासाचीही अंमलबजावणी होणार आहे. विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी भूसंपादन करणार आहे. याठिकाणी सर्व सुविधांसाठी, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्या माध्यमातून शासकीय उच्चस्तरीय व स्थानिक समितीद्वारे कार्यवाही करण्यात येणार आहे.’’

मुंबई, पुण्यासह राज्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या आणि १० मंत्री व २० पेक्षाही अधिक आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची बाब गांभीर्याने घेऊन लॉकडाउनबाबतही मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखालील टास्कफोर्सच्या बैठकीत गांभीर्याने निर्णय घेण्यात येवू शकतात. त्यासाठी जनतेनेही अधिक काळजी घ्यावी.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT