पुणे

फार्मसी क्षेत्राला उच्चांकावर न्या

CD

सासवड शहर, ता. १३ : ‘‘औषधे देताना रुग्णाचे समुपदेशन योग्य पद्धतीने करा. पैशाबरोबर औषधांच्या गुणवत्तेला महत्त्व द्या. गुणवत्तेत कोणती ही तडजोड न करता संशोधनावर भर द्या. फार्मसी क्षेत्राला उच्चांकावर न्या,’’ असे आवाहन पूना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. आत्माराम पवार केले.
सासवड (ता. पुरंदर) येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शेठ गोविंद रघुनाथ साबळे औषधनिर्माण शास्त्र पदवी व पदविका महाविद्यालय आणि पुरंदर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने फार्मसी महाविद्यालयात दोन दिवसीय रजिस्टर फार्मासिस्ट कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल. एम. पवार हे होते.
प्रथम सत्रामध्ये वेस्ट झोन महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे जॉइंट सेक्रेटरी दत्तप्रसाद टोपे, पुणे जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन माजी उपाध्यक्ष भरत मोकाशी, देव सेल्स अँड प्रायव्हेट लिमिटेड संचालक नितीन देव, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन ऑर्गनायझेशन सेक्रेटरी राहुल देशपांडे, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, उपाध्यक्ष नंदकुमार जगताप, पुरंदर केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष जगदाळे आदी उपस्थित होते. दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रामध्ये लेखक व व्याख्याते दत्ता कोहीनकर यांनी मनःशक्ती आणि तणाव नियोजन यावर, महाराष्ट्र राज्य औषध परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना आणि औषध परिषदेच्या फार्मसी व्यवसायातील योगदान याविषयावर; तर डॉ. अमित खाडे यांनी घाऊक औषध विक्री सद्यःस्थितीवर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रज्ञा जगताप, प्रा. सागर भिसे. प्रा. श्वेता फडतरे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT