पुणे

शिरूर येथे एसटी कामगारांना किराणा किटचे वाटप

CD

शिरूर, ता. १५ : सरदवाडी (ता. शिरूर) येथील दिवंगत भेळविक्रेते लक्ष्मणराव रामभाऊ कुंडलिक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या कुटुंबीयांनी एसटी कामगारांना किराणा किट भेट दिले.
लक्ष्मणराव कुंडलिक यांच्या जन्मदिनी कुंडलिक कुटुंबीयांनी संपामधील कामगारांची आठवण ठेवली. संपामुळे अनेक कामगारांना पगार मिळत नसल्याने त्यांना प्रपंचाचा गाडा पुढे ढकलणे मुश्‍कील झाले आहे. ही समस्या ओळखून कुंडलिक कुटुंबीयांनी शिरूर बसस्थानकावर येऊन संपात सहभागी झालेल्या एसटी कामगारांना सर्व जीवनावश्‍यक वस्तूंचा समावेश असलेले किराणा कीट भेट दिले. संपामुळे अनेक कामगारांच्या कुटुंबांचे हाल होऊ लागले आहेत. ही बाब ओळखून केवळ सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांना किराणा किट दिल्याचे दत्तात्रेय (बंटी) कुंडलिक यांनी सांगितले. यावेळी प्रमोद कुंडलिक, अभिजित कुंडलिक, निखिल कुंडलिक, अनिकेत कर्डिले व कुंडलिक यांचा मित्र परिवार उपस्थित होता. कामगारांच्यावतीने कुंदन कांडेकर, माधव मुंडे, मनोज ओतारी यांनी कुंडलिक परिवाराचे आभार मानले.
PNE22S43439

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon: माॅन्सूनची अजून पाच दिवसांची प्रतीक्षा! राज्यात ७२ टक्के कमी पावसाची नोंद, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात बहुतेक जिल्ह्यांमध्ये अत्यल्प पाऊस

आजचे राशिभविष्य - 16 जून 2026

Moong Dal Palak Idli Recipe: प्रोटीन आणि आयर्नचा भरपूर खजिना; नाश्त्यासाठी बनवा मऊ अन् स्पंजी 'मूग डाळ-पालक इडली'

16 जून 2026 पंचांग! चंद्रदर्शन, त्रिपुष्कर योग आणि शुभ मुहूर्तांची माहिती

अस्थिबोध : गरम पाण्याची पिशवी की बर्फ?

SCROLL FOR NEXT