पुणे

जाधव, भोकसे आमदार केसरीचे मानकरी

CD

आंबेठाण, ता.२४ : बिरदवडी (ता.खेड) येथे पार पडलेल्या आमदार केसरी बैलगाडा शर्यती रंगल्या. विघ्नेश जाधव आणि संदीप भोकसे यांच्या जुगलबंदीने बाजी मारीत बुलेट दुचाकी आणि आमदार केसरी २०२३ चषकावर नाव कोरले आहे. जिल्ह्यातील नामांकित १२० बैलगाडा मालकांनी शर्यतीत सहभाग घेतला.

शर्यतीत सव्वा तीन लाख रुपये रोख स्वरूपात, २१ दुचाकी, भव्य चषक असे बक्षिस स्वरूपात ठेवले होते. यावेळी सहभागी प्रत्येक गाडामालकांना सहभागाबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. गणेश नारायण भुजबळ यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांकासाठी फळीफोड करीत प्रथम क्रमांक पटकाविला. दुसऱ्या क्रमांकात संभाजी राऊत यांचा बैलगाडा फळीफोडचा मानकरी ठरला. तर घाटाचा राजा हा किताब रामनाथ वारिंगे आणि संतोष मांडेकर यांच्या जुगलबंदीला देण्यात आला. घाटाचा राजा या किताबासाठी दुचाकी बक्षीस देण्यात आली.
आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिरदवडी यात्रा कमिटीचे अध्यक्ष युवराज चौधरी, पैलवान विकास नायकवाडी यांनी या बैलगाडा शर्यती आयोजन केले होते.
आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी अध्यक्ष निर्मला पानसरे,माजी महापौर राहुल जाधव, माजी सभापती बाबूराव वायकर, पीएमआरडीए सदस्य वसंत भसे, माजी सभापती नवनाथ होले आदींनी शर्यतीस भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. दरम्यान, कुठल्याही प्रकाराचा वादविवाद न होता शासकीय नियमांचे पालन करीत शर्यत शिस्तबद्धरीत्या पार पडली.

प्रशांत भागवत यांना ''आकर्षक बारी''चा किताब
कांडे लावून झालेल्या शर्यतीत २० फुटावरून कान्हूर मेसाई येथील फक्कडराव शिंदे यांच्या बैलगाड्याने प्रथम क्रमांक पटकावत दुचाकीचे मानकरी ठरले. तर बैलगाडा घाटातील ''आकर्षक बारी'' हा किताब प्रशांत भागवत यांच्या बैलगाड्याला देण्यात आला.

02643

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT