पुणे

पिंपळसुटी सोसायटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र लगड

CD

आंधळगाव, ता. १५ : पिंपळसुटी(ता.शिरूर) येथील पिंपळसुटी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी राजेंद्र सर्जेराव लगड यांची बिनविरोध निवड झाली. दशरथ फलके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होते. संस्थेच्या कार्यालयात अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी राजेंद्र लगड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ए.एच धायगुडे यांनी जाहीर केले.

दरम्यान, सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीत पिंपळसुटी सोसायटीच्या कार्यालयात संस्थेच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम झाला. यावेळी राजेंद्र लगड यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी निवडणूक कार्यक्रमात संस्थेचे सचिव संदीप फलके यांनी मदत केली. यावेळी संभाजी फराटे, नानासाहेब फलके, रावसाहेब फराटे, शिवाजी लगड, विलास फलके, सुनील फलके, छबन लगड, शशिकांत वेताळ, योगेश लगड, सुभाष कापरे, सतीश वाबळे, भाऊसाहेब खळदकर, नानासाहेब संभाजी थोरात, सतीश लगड, शिवाजी खळदकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, नवनिर्वाचित अध्यक्ष राजेंद्र लगड म्हणाले, ‘‘सभासद व संस्थेच्या हिताच्या दृष्टिकोनातून सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेचे कामकाज केले जाईल. संस्थेच्या नावलौकिकात भर पाडण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Awade : माजी मंत्री प्रकाश आवाडेंच्या मनातलं ओठावर आलं, खासदारकी लढवण्याचे दिले संकेत; आवाडे म्हणाले...

Sharad Pawar : ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Yashasvi Jaiswal : 'जर कोणी हद्द पार करत असेल, तर...', हर्षा भोगलेंच्या व्हिडिओवर जैस्वालची तिखट कमेंट; नेमकं काय घडलंय?

Marathi News Live Updates : चामोर्शी ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीत माता-बाळाचा मृत्यू, डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप

Mumbai Ganeshotsav: 'चिंचपोकळीच्या चिंतामणी'ला अदाणींची साथ, जाहिरातीसाठी प्रायोजक म्हणून मंडळासोबत करार

SCROLL FOR NEXT