मांडवगण फराटा, ता. १ : शिरूर तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेऊन मानव- बिबट संघर्ष टाळण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलर्ट सिस्टीम बसविण्यात आल्या आहेत. या प्रणालीमुळे बिबट त्या मार्गावरून जात असल्यास त्याच्या शरीरावरील पॅटर्न ओळखून सायरन वाजतो. त्यामुळे आसपासच्या लोकांना त्वरित माहिती मिळून ते सावध राहू शकतात.
शिरूर तालुक्यातील १२ संवेदनशील ठिकाणी या प्रणाली बसविण्यात आल्या असून, त्यामध्ये पिंपळाचा मळा (मांडवगण फराटा), फराटेवाडी (मांडवगण फराटा), शिवनगर (इनामगाव), फिरंगी मळा (पिंपळसुटी), घायतडक वस्ती (करडे), अण्णापूर, संगमवाडी (म्हसे बुद्रुक), आमदाबाद, निमोणे, निमगाव दुडे, जांबूत व पिंपरखेड या भागांचा समावेश आहे. या अलर्ट सिस्टीमच्या स्थापनेसाठी जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे, जुन्नर विभागाच्या सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे आणि शिरूर वनविभागातील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. या अभिनव प्रयोगामुळे बिबट्याचा वावर असलेल्या भागातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, संघर्ष टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात अधिक संवेदनशील असलेल्या ठिकाणी अलर्ट सिस्टीम बसविण्याला प्राधान्य दिले आहे. या सिस्टीममुळे बिबट आल्यास मोठ्याने आवाज येऊन आजूबाजूच्या परिसरातील लोक सावध होतील आणि दुर्घटना टाळण्यास मदत होईल. यामुळे तालुक्यात मानव- बिबट संघर्ष कमी होईल, असा विश्वास आहे.
- नीलकंठ गव्हाणे, वनपरीक्षेत्र अधिकारी, शिरूर
02410
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.