आळंदी, ता. २४ : गर्दीच्यावेळी अचानक भाविकाला शारिरिक आरोग्य समस्या निर्माण झाल्यास तत्काळ उपचार करता यावेत यासाठी आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्यावतीने माउली मंदिरात दोन आरोग्य सेवा बूथ केले आहेत. त्यापैकी एक दिवसभर आणि दुसरा दिवस-रात्र पाळीत सेवा देणार आहे.
आरोग्यसेवा बूथचे उद्घाटन आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. राधा किशन पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, माजी नगरसेवक डी. डी. भोसले यांच्या हस्ते झाले. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिक्षक डॉ. ऊर्मिला शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचित्रा खेडकर, डॉ. इंदिरा पारखे, डॉ. विद्या कांबळे यांची उपस्थिती होती.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. ऊर्मिला शिंदे म्हणाल्या, वारी काळात वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी जादाचे कर्मचारी नेमले आहेत. मंदिरामध्ये विशेष सेवा देण्यासाठी दोन आरोग्य बूथ ठेवले आहेत. यामध्ये रुग्णांच्या तपासणी बरोबरच ईसीजी मशिन, तापमान पाहण्यासाठी थर्मल गन, सलाईन व्यवस्था, सर्व उपयुक्त गोळ्या औषधे, मलम, कफ सिरप, इंजेक्शन्स आणि एक बेड अशी अति दक्षता सेवाही ठेवण्यात आली आहे.
आरोग्य सेवा बूथवर दोन डॉक्टर्स, एक परिचारिका, दोन इंटर्न डॉक्टर्स आणि एक शिपाई असे मनुष्यबळ देण्यात आले आहे. आरोग्य विषयक साहित्य माहिती देणारा बोर्डही बुथवर लावला आहे. सोमवार (ता. २५) पासून भूलतज्ज्ञ सेवा उपलब्ध केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.