आळंदी, ता. २३ : रात्रपाळीच्या कामाकरता जात असलेल्या दुचाकीवरील कामगारास चारचाकीची धडक बसल्याने मणक्याचे हाडास गंभीर इजा झाली. अपघातास कारणीभूत ठरल्याबद्दल आणि अमली पदार्थांचे सेवन करून बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे अपघात झाला. या प्रकरणी चिंचवड येथील सचिन अशोक जगताप (वय ३१, शाहूनगर चिंचवड) यांच्यावर आळंदी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना बुधवारी (ता. २१) सायंकाळी सातच्या दरम्यान आळंदी नगरपरिषद चौकामध्ये घडली. याबाबत फिर्याद उमेश भारत करपे (रा. श्रीराम पार्क चऱ्होली खुर्द, मूळचा केज, जि. बीड) असे यांनी दिले असून ते गंभीर जखमी आहेत. आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी उमेश करपे त्यांच्या दुचाकी (एम एच १४, एच ए ६६४) वरून कामानिमित्त जात असताना आळंदी येथे नगरपरिषद चौकामध्ये आल्यानंतर सचिन जगताप यांच्या चारचाकी कारची (एम एच १४ सि एच ४०४१) ठोकर करपे यांना बसली आणि ते खाली पडले. कारचालक जगताप अंमली पदार्थाचे सेवन करून गाडी चालवत होते, तसेच अपघात झाल्यानंतर न थांबता निघून गेले. दरम्यान फिर्यादी करपे यांच्या मणक्याच्या हाडास गंभीर दुखापत झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.