पुणे

उसाची पाचट जाळू नका ः विकास चव्हाण

CD

आळेफाटा, ता. ७ ः ‘‘सध्या जुन्नर तालुक्यात ऊस तोडणीनंतर बहुतेक शेतकरी राहिलेली पाचट पेटून देतात. शेतकऱ्यांनी पाचट पेटून न देता त्यावर प्रक्रिया करून खत तयार करावे,’’ असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या ऊस नियोजन समितीचे सदस्य विकास चव्हाण यांनी केले.

चव्हाण यांनी स्वःताच्या शेतामध्ये आडसाली उसात त्यांनी विक्रमी एकरी १२६ टन तर खोडव्याचे तब्बल ११० टनाचे उत्पन्न घेतले. केवळ स्वतःचे उत्पन्न वाढवून ते थांबले नाही तर महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांपर्यंत त्यांनी हे तंत्रज्ञान पोहचवण्याचे काम करत आहे. उसाचे पाचट म्हणजे सोन ते जाळू नका, हे शेतकऱ्यांना पटवून देऊन त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत झाली आहे.
पाचट ठेवल्यामुळे सतत वाफसा स्थिती जमिनी कायम राहतो. यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते. पाण्याची बचत; पाचट आच्छादनामुळे संपूर्ण जमीन झाकली जाते. जमिनीतून पाण्याचे बाष्पीभवन कमी होते. दहा ते वीस दिवस ओलावा टिकून राहतो. पाण्याची ४० टक्के पर्यंत बचत होते. पर्यावरणाचे संरक्षण पाचट पेटवल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. पाचट शेतात ठेवल्यामुळे आपणालाही प्रदूषण रोखता येते, ग्लोबल वॉर्मिंगचे संकटाला यामुळे प्रतिबंध होतो. जमिनीचे तापमान योग्य राखले जाते. त्यामुळे उपयुक्त जिवाणूंच्या संख्येत वाढ होऊन जमिनीतील नत्र स्थिरीकरण स्फुरद पालाश उपलब्धतेचे प्रमाण वाढते. खुरपणी व मशागतीच्या खर्चात बचत होते. उसाच्या उत्पादनात पाच ते सहा टनांनी वाढ होते. पाचट आच्छादनामुळे जमिनीतील सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते जमिनीचा खारवट व चोपण पणा कमी होऊन जमिनीची सुपीकता वाढते. जमिनीतील विद्युत वाहकता क्षारांचे प्रमाण कमी होते जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते. पाचट कुजल्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जमिनीमध्ये वाढते त्यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढण्यास मदत होतो.

पाचट जाळण्याचे दुष्परिणाम
-पाचट जाळल्यामुळे जमिनीतील उपयुक्त जीव जिवाणूंची संख्या घटते. जमिनीचा थर कडक होतो.
-पाचट जाळल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचे संकट वाढत आहे. एकरी दीड ते दोन टन सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात
-उसाच्या उत्पादनात मोठी घट येते त्यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ऊस तुटून गेल्यानंतर राहिलेले पाचट जाळू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jitendra Awhad: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आव्हाडांचे वादग्रस्त विधान; विधानसभेत गदारोळ

घरकूल लाभार्थीकडून 12,000 लाच घेणारा ग्रामसेवक व शिपाई पकडला! 20 हजाराची मागणी, 15 हजार द्यायचे ठरले अन्‌ 12 हजार घेतले, वाचा...

Pune Crime: पुण्यात अपघाताच्या बहाण्याने वाहनचालकांना लुटणारे मेरठचे दोघेजण गजाआड; गाडी पायावरून गेल्याचा बनाव अन्..

बापाचाच लेकीवर अत्याचार! अल्पवयीन मुलगी गर्भवती, आजारी असल्याने माढ्यातील दवाखान्यात गेली, डॉक्टरांनी तपासणी केली अन्‌...

Pune News: पुणे महापालिकेने केली तब्बल ८०० कोटीची करमाफी; चार महिन्यात १ हजार ७० कोटीची वसूली, काय आहे अभय योजना?

SCROLL FOR NEXT