पुणे

‘जिल्ह्याचा पर्यटन आराखडा तयार’

CD

आळेफाटा, ता.२४ : ‘‘सबस्टेशनचा फायदा या परिसरातील गावांना होणार आहे तसेच जिल्ह्याच्या पर्यटन आराखडा तयार केला आहे. या मध्ये विशेष करून जुन्नर तालुका हा राज्यात पर्यटन तालुका जाहीर झाला आहे. भविष्यात पर्यटनाच्या मार्फत युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार या ठिकाणी उपलब्ध होणार आहे.तसेच या गावाची मोजणी करण्यात आली त्यामुळे लोकांमधील वाद कमी होणार आहे,’ असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.
बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथे ३३/११ के.व्ही. सबस्टेशन भूमीपूजन सोहळा व स्मार्ट व्हिलेज पर्यटनग्राम शेतजमीन मोजणी प्रकल्पातील क पत्रकाचे वाटप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की लाडक्या बहिणींना नाराज करणार नाही. त्यांच्यामुळेच आम्ही निवडून आलोय. त्यामुळे त्यांच्या खात्यावर दर महिन्याला मिळत असलेले पंधराशे रुपये बंद होणार नाही.
याप्रसंगी माजी मंत्री व आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, डॉ. सुहास दिवसे, मुख्य अधिकारी गजानन पाटील, महावितरणचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, सुधीर काकडे, युवराज जरग, शांताराम बांगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.संजय काळे, शरद लेंडे, आशा बुचके, गणपतराव फुलवडे, अनंतराव चौगुले,प्रकाश जाधव, बाळासाहेब औटी, वल्लभ शेळके,भास्कर गाडगे, प्रियंका शेळके, संतोष खैरे, जयसिंग औटी गावच्या सरपंच वनिता डेरे, माजी सरपंच पुष्पा कोरडे,दिनेश जाधव,मोजणी समितीचे अध्यक्ष रंजन जाधव, ॲड.संजय टेंबे,पर्यटन व सांस्कृतिक वारसा संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अमोल कोरडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष युवराज कोरडे,गणेश औटी, सतीश जाधव,सुनील जाधव तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : पुणे जिल्ह्यात नराधमाचा अमानुषपणा! चिमुरडीच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; आरोपीला मिळणार मृत्यूदंडाची शिक्षा?

Latest Marathi News Live Update : 12 वी च्या निकालात, बुलढाणा जिल्हाचा निकाल 95.22 % टक्के

Hasan Mushrif Statement : “गोकुळचा निकाल लागेल त्या दिवशी गुलाल लावूनच प्रतिक्रिया,” हसन मुश्रीफांनी शिवाजी पाटलांना थेट डिवचलं

Mumbai: पुनर्वसन ४० वर्षे रखडले; उच्च न्यायालयाचे केंद्र, ‘जेएनपीए’ला खडे बोल

Shahuwadi crime : कोल्हापुरातील मलकापूरमध्ये धक्कादायक घटना; सख्या भावानेच केला भावाचा खून, भाऊ फरार

SCROLL FOR NEXT