पुणे

देशसेवा बजावत निवृत्त झालेल्या हाडवळे यांचा सन्मान

CD

आळेफाटा, ता. ५ : राजुरी (ता. जुन्नर) गावातील प्रवीण गुलाबराव हाडवळे २० वर्षांची देशसेवा करून निवृत्त झाले आहेत. नुकत्याच झालेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांचा गावाच्यावतीने तसेच फुलागंगा मळ्यामधील विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी सभापती दीपक औटी, दत्तात्रेय महाराज भोर, सरपंच प्रिया हाडवळे, उपसरपंच माउली शेळके, वल्लभ शेळके, एम. डी. घंगाळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कुंडलिक हाडवळे, सुभाष औटी, गोरक्ष हाडवळे, चंद्रकांत जाधव, शाकीर चौगुले, पंकज कणसे, मुरलीधर औटी, कॅ. महादेव हाडवळे, मंडळाचे अध्यक्ष रामदास सरोदे, गोविंद हाडवळे,
पांडुरंग हाडवळे, सावळेराम हाडवळे, देवराम हाडवळे, संपत हाडवळे उपस्थित होते
हाडवळे यांनी त्रिपुरा, जम्मू, ओरिसा, राजस्थान, आसाम, पंजाब, जम्मू या ठिकाणी देशसेवा बजावली आहे. निवृत्त झाल्यानंतर गावात आल्यावर त्यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यांची गावातून मिरवणूकही काढण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन जि. के. औटी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''बेफाम गुन्हेगारी वाढलेल्या सरकारला मी पाठिंबा देतोय...'' चिराग पासवान यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला मृत्यूचा सापळा! ३३५ जणांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

Solapur News: आई माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली...' अल्पवयीन मुलानं पत्र लिहिलं अन् जीवन संपवलं, कारण काय?

Healthy Lifestyle Tips: निरोगी आयुष्यासाठी खा ‘ही’ कोरडवाहू भागातील रानभाज्या, जाणून घ्या त्यांचे अप्रतिम फायदे

Nashik Road Railway Station : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर बाटली टाका, बक्षीस मिळवा; प्लॅस्टिकमुक्तीसाठी अभिनव उपक्रम

SCROLL FOR NEXT