पुणे

‘शुद्ध दुधासाठी पाश्चरायझेशन तंत्रज्ञानाची गरज’

CD

आळेफाटा, ता. ११ : ‘‘ग्रामीण भागातील शुद्ध दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पाश्चरायझेशन व होमोजिनायझेशन तंत्रज्ञान काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे दुधाची गुणवत्ता वाढून तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील,’’ असे प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिल्लारी यांनी केले.

येथील गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त नूतन कार्यालय, गोमाता दुग्धालय आणि अद्ययावत पाश्चरायझेशन प्रकल्पाचे उद्घाटन खिल्लारी यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, सुरेश गडगे, मंगेश काकडे, नेताजी डोके, अनंतराव चौगुले, उपसरपंच गणेश भुजबळ उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष गणेश वाघमारे म्हणाले की, संस्थापक कै. भीमाजी गडगे यांनी लावलेल्या या रोपट्याचा आज वटवृक्ष झाला असून, शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. या निमित्ताने वासरू मेळावा घेण्यात आला असून विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तसेच मेजर रमेश खरमाळे, डॉ. सदानंद राऊत, अशोक गडगे, रजनी डुंबरे व डॉ. संजय देवकर यांना ‘गोमाता कृतज्ञता पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. माजी संचालक व ज्येष्ठ सभासदांचाही यावेळी गौरव करण्यात आला. सचिव अभिषेक कोकाटे यांनी प्रास्ताविक केले, तर अशोक गडगे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

IPL 2026, GT vs PBKS: शुभमन गिलने जिंकला टॉस, गुजरातकडून २२ वर्षीय खेळाडूचं पदार्पण; पंजाब संघातही मोठा बदल; पाहा Playing XI

May 2026 Horoscope: मे महिन्यात रुचक योगाचा शुभ संयोग! कोणाला लाभ तर कोणाला सावध राहण्याची गरज? वाचा मेष ते मीन राशींचे राशीभविष्य

AI Apps : फक्त ChatGPT अन् Gemini म्हणजे AI नाही; रोजच्या वापरासाठी 'हे' 5 ॲप्स आहेत बेस्ट, एकदा वापरुन तर बघा

‘ती’ आली… आणि सगळ्यांचा उडाला थरकाप! ‘तुंबाडची मंजुळा’चं भन्नाट पोस्टर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT