पुणे

कृषी पदवीधर तरुणाकडून कांदा बिजोत्पादन

CD

पारगाव, ता. ५ : वाळुंजनगर (ता. आंबेगाव) येथील कृषी पदवीधर जयेश तान्हाजी वाळुंज या तरुणाने कांद्या ऐवजी बिजोत्पादन घेतले व त्यातून भरघोस घेतले. केवळ १० गुंठे क्षेत्रात खर्च वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा मिळेल, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

कांदे, खते, औषधे, ठिबक यांचा मिळवून एकूण २५ हजार रुपये भांडवली खर्च आला आहे. १० गुंठे क्षेत्रातून ८० ते १०० किलो कांदा बी उत्पादन होईल कमीत कमी १५०० ते २००० रुपये प्रती किलो या प्रमाणे कांदा बी विक्री झाल्यास उत्पादन खर्च वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा मिळेल. असा विश्वास जयेश याने व्यक्त केला.

मागील काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात सातत्याने घसरण सुरू आहे. सध्या कांदा प्रती १० किलो ६० रुपयांपासून १२० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. एक एकरातील कांदा विक्रीतून अवघे लाखभर रुपये मिळत असल्याने खर्च वजा जाता अगदी नगण्य शिल्लक राहत आहे तर काही वेळेस उत्पादन खर्चही भागत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे, अशी माहिती लोणी उपबाजार समितीमधील कांद्याचे व्यापारी महेंद्र वाळुंज व खडकवाडी येथील कांदा उत्पादक संतोष रामभाऊ सुक्रे यांनी दिली. दरम्यान, जयेश याने दत्तात्रेय धुमाळ व महेंद्र वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली कांदा लागवड केली.

लागवडीसाठी ११ गोणी कांदा १५ रुपये प्रती किलो दराने खरेदी केला व लागवड केली. ठिबकद्वारे पाणी दिल्याने खते देणे सोपे झाले. ८ ते १० दिवसांच्या अंतराने फवारणी केली. सध्या ८५ दिवसांचा कांदा बिजोत्पादन प्लॉट झालेला आहे एक महिन्यात काढणीस तयार होईल.
- जयेश वाळुंज, शेतकरी

..............................
02165

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT