पुणे

खकवाडीत समीर भगतची मिरवणूक

CD

पारगाव, ता. १५ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील खडकवाडी येथील समीर किसन भागवत याची भारत सरकारच्या कृषी आणि अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरण भारत सरकारमध्ये साहाय्यक महा व्यवस्थापक ( वर्ग-१) पदी देशात प्रथम क्रमांक येऊन निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांतर्फे मिरवणूक काढून जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक नेताजी गंधारे, सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक मधुकर शिंदे, पोलिस अधिकारी बंडू वारे यांच्या हस्ते समीरचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपट वीरकर यांनी भूषविले. यावेळी समीर भागवत व त्यांचे सहकुटुंब उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष देवदत्त निकम , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, निरगुडसरचे सरपंच रवींद्र वळसे पाटील, भाजप तालुका मंडल अध्यक्ष किरण वाळुंज, रोहिणी वाळुंज, अंकिता वाळुंज, गणेश पंडित, सरपंच सविता डोके, उपसरपंच आदिनाथ सुक्रे, नाथा सुक्रे ,उदय डोके,कमल सुक्रे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद, माध्यमिक शाळा, दोन्ही शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी संघ व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते.

06342

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT