जुन्नर, ता. २५ : राज्यातील पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचा अभ्यास करता यावा, नवीन तंत्रज्ञान शिकावे या उद्देशाने अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देशाबाहेर अभ्यास दौरे योजनेंतर्गत राज्यातील ४१ शेतकऱ्यांसाठी संपूर्ण तयारी झालेल्या युरोप दौऱ्याला परकीय चलन दरवाढीचा फटका बसला आहे. त्यामुळे हा अभ्यास दौरा म्हणजे दिवास्वप्न ठरते की काय? अशी शंका उपस्थित होत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
राज्याच्या कृषी विभागामार्फत गेल्या तीन वर्षांपासून शेतकरी अभ्यास दौऱ्याला मुहूर्त मिळत नव्हता. दोन वेळा पुरस्कारप्राप्त व प्रगतशील शेतकरी निवड होऊन पण हा दौरा निश्चित होत नव्हता. निधी उपलब्ध होऊन पण २०२३-२४ला कृषी विभागाने दिरंगाई केली होती. अखेर २०२५ ला तिसऱ्यांदा अर्ज मागवून शेतकरी यादी अंतिम झाली, सर्व कागदपत्रे पूर्तता झाल्यानंतर देखील वेळेवर निविदा न काढल्याने युरोप ला फ्रांस, जर्मनी, नेदरलँड, स्वीतझरलँड या देशातील शेतकरी अभ्यास दौऱ्यास विलंब झाला. युरोपची आधुनिक शेती, तंत्रज्ञान व पशुपालन, आदी पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांकडून युरोप खर्चाच्या ५० टक्के प्रमाणे दोन लाख १९ हजार इतका शेतकरी हिस्सा म्हणून कृषी विभागाने लोधी एअर टूर्स या प्रवासी कंपनीच्या खात्यावर भरून घेतला. विशेष म्हणजे ऑगस्टला निविदा होऊन देखील या कंपनीने समाविष्ट ४१ शेतकरी व दोन कृषी अधिकारी यांचे व्हिसा काढणे आणि इतर प्रकिया करायला पाच महिने इतका विलंब केल्याने परकीय चलनाचा दर वाढला. आधीच राज्यातील शेतकरी मेटकुटीला आला आहे. त्यात गाझीयाबाद येथील प्रवासी कंपनीचा चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कृषी विभागाने परकीय चलन वाढीनुसार फरकाची वाढीव २५ हजार रक्कम शेतकऱ्यांना मागायला सुरुवात केली. त्यात प्रत्यक्षात दौरा निघेल. त्या महिन्यात आणखी होणारी वाढ देखील शेतकऱ्यांना भरावी लागणार असल्याचे म्हटले आहे. ज्याला दौरा रद्द करायचा असेल त्याची कंपनीने खर्च केलेली रक्कम कापून घेण्यात येईल, असे सांगितल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
व्हिसासाठी अर्ज केला त्यादिवशी चलनवाढीच्या रकमेबाबत माहिती कृषी विभागाने लपवली नसती तर त्याच दिवशी खर्च न परवडणारे शेतकरी अर्ज न करता घरी गेले असते आणि खर्च वाचला असता पण आता कृषी विभागाने रक्कम पण घेतली आणि ओरिजनल पासपोर्ट ही त्यांच्या कृषी अधिकाऱ्यांकडे ठेऊन शेतकऱ्यांची अडवणूक केली आहे. शिवाय आता एकतर या महिन्याची चलन वाढ फरकाची २५ हजार आणि फेब्रुवारी ची फरकाची रक्कम भरा नाहीतर दौरा रद्द करून नुकसान करून घ्या, अशी द्विधा स्थिती झाली आहे.
दौरा ठरला, हॉटेल बुकिंग, झाले, विझा प्रक्रिया पूर्ण झाली, २ दिवस पुण्याला बोलावून कृषी अधिकारी व लोधी एअर टूर्स कंपनी ने सर्व पूर्तता केली, १६ फेब्रुवारी मुहूर्त ठरला पण राज्यभरतून युरोप अभ्यास दौऱ्या साठी उत्सुक असलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे.
- योगेश पवार, प्रगतशील शेतकरी, पुणे
सरकारच्या नावाने आयोजित दौऱ्यात झालेल्या विलंबाची किंमत शेतकऱ्यांनी का भरायची० परकीय चलन वाढीचा बहाणा करून आमच्यावर अतिरिक्त आर्थिक ओझे टाकले जात आहे.
- अशोक दरेकर, पुरस्कारप्राप्त शेतकरी गुंजाळवाडी, जुन्नर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.