बावडा, ता. २५ : बावडा (ता. इंदापूर) भागात अवकाळी पावसाची जोरदार संततधार रविवारी दिवसभर सुरू होती. गेली अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने व आजच्या दिवसभराच्या संततधार पावसाने शेतात सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे. त्यामुळे शेतमजूर वर्गाला शेतात जाता आले नाही. दिवसभर नागरिकांना घरातच विश्रांती घ्यावी लागली. बाजारपेठेवरही परिणाम होऊन आर्थिक उलाढाल थंडावली होती. दिवसभराच्या संततधारेमुळे कामगारांना पावसात भिजत घरी यावे लागले. नागरिकांना सूर्यदर्शनही होऊ शकले नाही. पहाटे सुरू झालेली पावसाची संततधार रात्री कायमच होती. या पावसाचा ऊस, मका आदी पिकांना चांगला फायदा झाला आहे. मात्र, भुईमूग, कांदा या पिकांच्या काढणीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.