sakal auto expo
sakal auto expo sakal
पुणे

Sakal Auto Expo 2023 : ‘सकाळ ऑटो एक्स्पो’चे आयोजन; पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार अन् दुचाकीचे अनेक पर्याय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : घटस्थापना, नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर नागरिकांना वाहनांची खरेदी अधिक सोपी व्हावी, तसेच त्यांना वाहनांचे विविध पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून ‘सकाळ माध्यम समूहा’च्यावतीने दोन दिवसीय ‘ऑटो एक्स्पो’चे आयोजन करण्यात आले आहे.

कर्वेनगरमधील डीपी रस्त्यावर असलेल्या पंडित फार्म्समध्ये शनिवारी (ता. १४) आणि रविवारी (ता. १५) या एक्स्पो पार पडणार आहे. वाहन खरेदी करण्याचे ठरल्यानंतर आपल्या बजेटनुसार विविध कंपन्यांची वाहने आपण तपासतो.

त्यासाठी अनेक कंपन्यांच्या शोरूमला भेटी देवून वाहनाची माहिती घेतली जाते. वाहन खरेदीदारांना नवीन गाडी घेताना करावी लागणारी ही सर्व धावपळ थांबविण्यासाठी ऑटो एक्स्पो भरविण्यात येत आहे.

पेट्रोल, डिझेल, इलेक्ट्रिक कार आणि दुचाकीचे अनेक पर्याय नागरिकांना या एक्स्पोत उपलब्ध असणार आहेत. एकाच बजेटचे अनेक पर्याय उपलब्ध असल्याने नेमकी कोणती गाडी घ्यायचा याचा निर्णय घेणे एक्‍स्पोच्या माध्यमातून सोपे होणार आहे.

या ठिकाणी विविध कंपन्यांच्या कार आणि दुचाकी, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्या किमती आदींची माहिती मिळणार आहे. एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल आणि महागड्या गाड्यांचे अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे टेस्ट रार्इडचा आनंद घेत आपल्या स्वप्नातील वाहन बुक करण्याचा निर्णय घेणे सोपे होणार आहे. एक्स्पोत २० हून अधिक ब्रँडचे ६० हून अधिक मॉडेल्स उपलब्ध असतील.

हे लक्षात ठेवा

  • कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर

  • कधी : शनिवार (ता. १४) आणि रविवारी (ता. १५)

  • वेळ : सकाळी १० ते रात्री ८

  • प्रवेश व पार्किंग मोफत

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२५१०६६२६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT