पुणे

भिगवण शिक्षण प्रसारक मंडळात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

CD

भिगवण, ता. ७ ः येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने सिनेतारकाची उपस्थिती, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळी व विद्यार्थ्यांचे बहारदार सादरीकरण प्रेक्षकांना पहावयास मिळाले.

वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलूज (जि. सोलापुर) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेअभिनेत्री स्मिता शेवाळे, अविनाश घोलप, सवितादेवी राजेभोसले, गणेश राख, भूपेंद्र बोधनकर, दिलीप पवार, संजय देहाडे, दीपिका क्षीरसागर, पराग जाधव, तानाजी वायसे, जयदीप जाधव, संजय रायसोनी आदी उपस्थित होते.

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज पूर्ण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. पंधरा वर्षांमध्ये संस्थेने नेत्रदीपक प्रगती केली असून, त्याचा विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.

सिनेअभिनेत्री स्मिता शेवाळे म्हणाल्या की, ग्रामीण भाग बदलतो आहे. ग्रामीण भागांमध्ये पालकही विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-निवडी जोपासण्यासाठी स्वातंत्र्य देत आहेत, ही आनंदाची बाब आहे. विद्यार्थ्यांनीही जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास यशाचे शिखर गाठता येईल.

यावेळी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. स्नेहसंमेलनामध्ये भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते शरदचंद्रजी पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय, क्षीरसागर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले कलाविष्कार सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

प्रास्ताविक तुषार क्षीरसागर यांनी, सूत्रसंचालन योगेश चव्हाण व प्रा. अविनाथ गायकवाड यांनी, तर आभार नवनाथ सावंत यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
---------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT