पुणे

अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार

CD

भिगवण, ता. २८ : शेटफळगढे (ता. इंदापूर) येथील एका अल्पवयीन मुलीवर दोघांनी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्यामुळे या प्रकार उघड झाला असून, या प्रकरणी अर्जुन ऊर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय ४५) व रमेश रघुनाथ मोरे (वय ३५, दोघेही रा. शेटफळगढे, ता. इंदापूर) या दोघांविरुद्ध ‘पोस्को’ व अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती येथील भिगवण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.
पीडित मुलगी ही अल्पवयीन व अनुसूचित जाती-जमातीतील असल्याचे माहीत असूनही यातील आरोपींनी ''तू माझ्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले नाही, तर तुझ्या वडिलांकडे तुझे मित्रासोबत प्रेमसंबंध आहेत, अशी बदनामी करीन'' अशी धमकी देत दोघांनी वेळोवेळी मुलीवर अत्याचार केले. दरम्यान मुलीची शारिरिक तपासणी केली असता मुलगी गरोदर असल्याचे निष्पन्न झाल्याने मुलीच्या आईने भिगवण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यातील रघुनाथ मोरे यास अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT