पुणे

भोर आगाराच्या कारभारामुळे प्रवाशांना मनस्ताप

CD

भोर, ता. १० : भोर आगारातील एसटी बसची सेवा पुन्हा विस्कळित झाली आहे. यामुळे दररोज हाल होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भोर-पुणे एसटीच्या चार फेऱ्या बुधवारी (ता.१०) अचानक रद्द झाल्यामुळे स्वारगेट एसटी स्टँडवर शेकडो प्रवासी दीड तास ताटकळत थांबले. परंतु गाड्या रद्द केल्याची माहिती देण्यात आली नसल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

रस्त्यात नादुरुस्त होणाऱ्या बस, कर्मचाऱ्यांची वानवा, फेरी अचानक रद्द करणे, गाड्या वेळेत न सोडणे आणि रद्द केलेल्या गाडीबाबत प्रवाशांना कल्पना न देणे यामुळे प्रवाशांना तासन् तास ताटकळट बसावे लागते. यामुळे आगाराच्या सेवेच्या ''पुन्हा येरे माझ्या मागल्या...'' अशी अवस्था झाल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

भोर आगाराला सर्वाधिक उत्पन्न हे भोर-पुणे मार्गावरील प्रवाशांमुळे मिळते. परंतु पुण्याहून भोरला येताना दररोज सायंकाळी गाड्या वेळेवर नसतात. भोर आगारात एसटीच्या केवळ ४४ बसगाड्या आहेत. त्यापैकी तीन-चार गाड्या नेहमीच बंद असतात तर दोन-तीन गाड्या रस्त्यांवरच नादुरुस्त होतात. याशिवाय आगारातील चांगल्या चार गाड्या बारामती आगाराला पाठविल्या आहेत. त्यामुळे जुन्या-नादुरुस्त गाड्यांमधूनच भोर तालुक्यातील प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. या सर्व गोष्टींमुळे प्रवाशांना दररोज मनस्ताप होत आहे.

प्रवाशांना सहन करावा लागतोय नाहक त्रास
सेवा वेळेवर देता येत नसेल तर कायमची एसटी बंद करून टाका. अशा शब्दात महिला प्रवासी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. एसटीच्या भाड्यात महिलांना ५० टक्के सवलत दिल्यामुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुरुष प्रवाशीही वाढले आहेत. सध्या लग्नसराईचे दिवस सुरू असल्यामुळे गाड्यांना गर्दी आहे. मात्र गाड्या वेळेवर येत नाहीत आणि अचानक फेरी रद्द केली जाते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.


01687

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT