पुणे

भोरमधील ७१ बांधकामे धोकादायक

CD

भोर, ता. २० : शहरातील जुनी बांधकामे असलेली ७१ घरे व इमारती या धोकादायक असल्याचे नगरपालिकेने जाहीर केले. संबंधित मालमत्ताधारकांनी या बांधकामाचा वापर करू नये आणि आगामी पावसाळ्यात अपघात होऊन जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी ही मालमत्ताधारकावर राहणार असल्याची नोटीस देण्यात आली आहे, अशी माहिती मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी दिली. पावसाळ्याच्या दिवसात वादळी वारे आणि पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे जुन्या इमारती किंवा त्याचा काही भाग कोसळला जातो. यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नगरपालिकेच्या वतीने शहरातील जुन्या व धोकादायक इमारती व बांधकामांची तपासणी केली जाते. जी बांधकामे कालबाह्य झाली आहेत किंवा मोडकळीस आलेली आहेत, त्या मिळकतधारकांना नोटीस देवून संबंधित बांधकाम किंवा त्याचा भाग खाली करावा, असा आदेश दिला आहे. शहरात एकूण ७१ बांधकामे धोकादायक ठरली आहेत.
दरम्यान, शहरातील जुन्या व धोकादायक इमारतींच्या सभोवताली वाढलेल्या अतिक्रमणामुळे त्या रिकाम्या (खाली) करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. यासाठी सर्वप्रथम आमच्या इमारतीशेजारील अनधिकृतपणे उभारलेल्या टपऱ्या काढाव्यात व अतिक्रमणे हटवावीत. त्यानंतर आम्ही आमच्या इमारतीचा धोकादायक भाग उतरवला जाईल. अशा आशयाचे उत्तर काही मालमत्ताधारक दरवर्षी नगरपालिकेला देत आहेत. परंतु, याबाबत नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT