भोर, ता. १८ : तालुक्यात शनिवारपासून (ता. १६) पुन्हा मुसळधार पावसास सुरुवात झाली असून, यावर्षी नीरा देवघर धरण क्षेत्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे तालुक्यातील नद्या-नाल्यांना पूर आला असून, धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.
यावर्षी नीरा देवघर धरण खोऱ्यातील नीरा नदीचा उगम असलेल्या शिरगावमध्ये सर्वाधिक ३ हजार ८१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी (ता. १७) शिरगावमध्ये १४५ मि.मी. पाऊस पडला. याशिवाय शिरवली हि.मा. येथे १०४ मि.मी.; तर हिर्डोशी येथे ९५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी (ता. १८) १० तासांत म्हणजे सायंकाळी पाच वाजेपर्यंत शिरगाव येथे ७६ मि.मी., शिरवली हि.मा. येथे ७५ मि.मी., तर हिर्डोशी येथे ६४ मि.मी. पावसाची नोंद झाली. यावर्षी शिरगाव खालोखाल भाटघर धरण खोऱ्यातील भूतोंडे येथे यावर्षी ३ हजार ६४८ मि.मी. आणि पांगारी येथे ३ हजार ३८४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर, कुरुंजी येथे ३ हजार ३१२ मि.मी. पाऊस पडला आहे. याखेरीज राजगड तालुक्यातील धीसर येथे मागील दहा तासांमध्ये १२१ मि.मी. पाऊस झाला. भोर आणि राजगड तालुक्यात शनिवारपासून सुरु झालेल्या पावसाचा सोमवारी सकाळपासून जोर वाढलेला आहे. सोमवारी सायंकाळी उशीरापर्यंत पाऊस सुरु होता. तालुक्यातील भाटघर आणि नीरा देवघर धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला असल्यामुळे नीरा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
यावर्षी झालेला पाऊस
गावाचे नाव पाऊस मि.मी.
शिरगाव- ३८१४
भूतोंडे- ३६४८
पांगारी- ३३८४
कुरुंजी- ३३१२
शिरवली हिमा- २७४८
हिर्डोशी - २८४६
नीरा देवघर धरण- १६५१
भाटघर धरण- ६२३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.