पुणे

बारामतीत प्रभातफेरी

CD

बारामती : मराठी दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रभातफेरी व नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन केले होते. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढत विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा गौरव करणाऱ्या घोषणा दिल्या. प्रभातफेरीनंतर विद्यार्थ्यांनी विविध नाट्यछटांचे सादरीकरण केले. प्राचार्या जॉयसी जोसेफ, संतोष कदम पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
नाट्यछटा स्पर्धेत श्रीजा गिरीश गावडे, आराध्य आकाश मलगुंडे यांना विभागून प्रथम क्रमांक व वेदिका शेखर चव्हाण, शिवन्या संजय ढवळे यांना विभागून द्वितीय क्रमांक देण्यात आला. नाट्यछटा स्पर्धेचे परीक्षक म्हणून संतोष कदम यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन सुप्रिया गुळवे यांनी केले. कै. गजाननराव भिवराव देशपांडे विद्यालयातही मराठी दिन साजरा झाला.
श्रीयश सकोजी प्रमुख पाहुणे होते. मुख्याध्यापक उमेद सय्यद, उपमुख्याध्यापक धनंजय मेळकुंदे, पर्यवेक्षक शेखर जाधव, सुनील खोमणे, स्वप्नील गोंजारी, तेजश्री शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेद सय्यद यांनी मनोगतात मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन हीना शेखने, प्रास्ताविक सानिका काकडेने तर आभार मोनिका शहा हिने मानले. कुसुमाग्रजांचा जीवनपट उलगडवून सांगण्याचा प्रयत्न विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेच्या ५६ विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांना साहित्यप्रकाराची माहिती व्हावी, म्हणून साहित्य प्रकारांचा वसा ही नाटिका सादर करण्यात आली. कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवासवर्णन हे साहित्यप्रकार आपल्या ओघवत्या भाषाशैलीत अनन्या काळे, श्रद्धा कुंभरकर, आर्या मलगुंडे, वैष्णव जांबले, यश पंडित, स्वराज गोसावी, श्रावणी पवार, सुकन्या इंगळे, अवंतिका वाबळे व अक्षरा लोकरे यांनी मांडण्याचा प्रयत्न केला.
सूत्रसंचालन वैष्णव जांबले याने तर आभार अमरसिंह गोफणे यानी मानले. कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका एस. एस. साठे, उपमुख्याध्यापक पी. आर. यादव, पर्यवेक्षक बी. डी. कुटे, एस. ए. मलगुंडे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election: उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस विरुद्ध काँग्रेस? नाराजांना गळाला लावण्याचे भाजपकडून प्रयत्न

MS Dhoni Cyber Scam : 'मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव...' धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान! Scam Alert

Latest Marathi News Live Update: आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना जामीन मंजूर

Guinness World Records' : पंडित धायगुडेंनी दुसऱ्यांदा रचले ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ ; पोटावरून २७६ किलोंच्‍या १२१ दुचाकी ३७६ वेळा चालवत नेल्‍या

Gautam Gambhir: एका रनासाठी गौतम झाला 'गंभीर', थेट अंपायरवर भडकला अन्...; कोलकाता-पंजाब मॅचमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT