ugc order to education institute to aware young voters
ugc order to education institute to aware young voters Sakal
पुणे

Pune News : मतदानात युवकांचा सहभाग वाढविण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये निवडणूक जागृती करण्याचे युजीसीचे आदेश

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे : ‘‘देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तरुणांमध्ये मतदानाचे महत्त्व आणि निवडणूक प्रक्रियेबाबत जागृती करण्यासाठी विद्यापीठे, महाविद्यालये यांमध्ये विशेष कार्यक्रम राबविण्यात यावेत. नवमतदारांची नोंदणी व्हावी, यासाठी प्रयत्न करावेत,’’ असा आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाचे महत्त्व तरुणांपर्यंत पोचविण्यासाठी देशातील सर्व विद्यापीठे, उच्च शिक्षण संस्थांना चर्चासत्र, व्याख्याने आयोजित करावीत, यासंदर्भात सूचनांचे पत्र आयोगाने सर्व उच्च शिक्षण संस्थांना पाठविले आहे.

आयोगाचे अध्यक्ष डॉ. एम. जगदीश कुमार यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया साइट्‌सवर याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. डॉ. एम. जगदीश कुमार यांनी सोशल मिडियावर ध्वनिचित्रफीत पोस्ट करत याबाबत सूचना दिल्या आहेत.

या ध्वनीचित्रफितीद्वारे ते म्हणाले,‘‘केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यामार्फत देशातील तरुणांमध्ये निवडणुकीबाबत जनजागृती करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याचाच एक भाग म्हणून आयोगामार्फत सर्व उच्च शिक्षण संस्थांना निवडणूक प्रक्रिया आणि मतदानाबाबत जागृतीसाठी ६ मार्चपर्यंत चर्चासत्रे, व्याख्याने असे कार्यक्रम आयोजित करण्याची सूचना देणारे पत्र पाठविण्यात आले आहे.

तसेच, नवमतदारांसाठी ‘मेरा पहिला वोट देश के लिए’ हे अभियान राबविण्याचा उल्लेखही पत्रात केला आहे. याशिवाय नवमतदारांची संख्या वाढविण्यासाठी ‘वोटर हेल्पलाइन ॲप’ डाऊनलोड करून त्यात नोंदणी करणे किंवा केलेल्या नोंदणीत आवश्यक असल्यास दुरुस्ती करण्याची प्रक्रियेबाबत उच्च शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, अशी सूचना केली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT