पुणे

बारामतीत गणपतीच्या आगमनाची लगबग

CD

बारामती, ता. २२ : गणपतीच्या आगमनासाठी बारामतीकर आतुर झाले असून ठिकठिकाणी गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दरवर्षी घरोघरी आणि काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. यंदा शाडू मातीच्या मूर्त्यांच्या किमती स्थिर असल्याची माहिती सुनील आणि सुहास भालेराव यांनी दिली. भालेराव कुटुंबीय १९५२ पासून मूर्ती विक्री करतात. यंदा पेणमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका बसला असून मागणीपेक्षा कमी मूर्ती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. यंदा प्रथमच लाल मातीचे काव आणि हळद यांचा वापर केलेले अत्यंत सुंदर गणपती आलेले आहेत.
दुसरीकडे गणेशोत्सवासाठी सजावटीच्या साहित्याच्याही किमती स्थिर असून बाजारात हे साहित्य खरेदीसाठी गर्दी उसळली आहे. फॅन्सी झाडांचे विविध प्रकार यंदा बाजारात आले आहेत. गौरीसाठी दागिने तसेच कापडी फुलेही यंदा पाहायला मिळत आहेत. पाच व सात फुटांच्या लडी, आकर्षक मुकुट, हिरव्या पानांच्या माळा, गळ्यातील विविध प्रकारचे हार, अँक्रेलिक, फर, सॅटीन, टिकली असे कापड, चौंरग पाट विविध आसने अशा प्रकारचे सजावटीचे साहित्य उपलब्ध असल्याची माहिती जयहिंद स्टोअरचे नरेंद्र आणि हार्दिक गुजराथी यांनी दिली.
सजावटीसाठी विविध प्रकारच्या दिव्यांच्या माळांनीही बाजारपेठ उजळून गेली आहे. विक्रीसाठी अनेक दुकानदारांनी या माळा लावलेल्या असून या माळांच्याही किमती यंदा स्थिर असल्याचे सांगितले गेले. या माळांसोबतच विविध प्रकारच्या दिव्यांची रोषणाईच्या खरेदीसाठीही बाजारात गर्दी होत आहे.
गणरायासोबतच गौरी आगमनाच्या दृष्टीनेही घरोघरी महिलांची लगबग सुरु झाली आहे. गौरी सजावटीचे सुंदर देखावे उभारले जातात. यातून काही सामाजिक संदेशही देण्याचा दरवर्षी प्रयत्न केला जातो. यंदा ही तयारी सुरु झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी गणेश मूर्ती व सजावटीच्या साहित्याचे स्टॉल सजले आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपाचीही तयारी सुरु झाली आहे.

पेणहून शाडूच्या आलेल्या लाल रंगाच्या मूर्ती यंदा आकर्षणाचे केंद्र आहे. मूर्ती हव्या तितक्या मिळाल्या नाहीत, मात्र किंमतीवर त्याचा काही परिणाम झालेला नाही.
- सुनील भालेराव, मूर्ती विक्रेते, बारामती.

सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारात भाविकांनी गर्दी केली आहे. यंदा अधिक नव्या फॅशनचे सजावटीचे साहित्य आलेले असून किमती मात्र स्थिर आहेत.
- नरेंद्र गुजराथी, जयहिंद स्टोअर, बारामती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT