बारामती, ता. १ : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून बारामती परिमंडलातील १६ हजार ८२९ घरगुती ग्राहकांना १२८ कोटी १० लाख रुपये अनुदान मंजूर केले असून, त्यापैकी १६ हजार ८८ ग्राहकांना १२२ कोटी २९ लाख रुपये अनुदान वितरित केले आहे. त्यात बारामती मंडळातील २४४७ (१८ कोटी ४७ लाख), सातारा मंडळातील ४७३१ (३५ कोटी ११ लाख), तर सोलापूर मंडळातील ८९१० (६८ कोटी ७१ लक्ष) ग्राहकांचा समावेश आहे.
या योजनेतून सौर प्रकल्पासाठी एक किलोवॅटसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये व तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. हाउसिंग सोसायटी व निवासी कल्याण संघटनांना ५०० किलोवॅटपर्यंत प्रती किलोवॅट १८ हजार रुपये अनुदान मिळेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करावी.
पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून घराच्या छतावर बारामती परिमंडळतील १८ हजार २७१ ग्राहकांनी ६१.४८ मेगावॉट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. त्यात बारामती मंडळातील २८५१ (९.८३ मेगावॉट), सातारा मंडळातील ५२९९ (१६.९५ मेगावॉट), तर सोलापूर मंडळातील १०१२१ (३४.७० मेगावॉट) ग्राहकांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.