पुणे

चाकण परिसरातील गैरप्रकारांवर कारवाईची मागणी

CD

चाकण, ता. २५ : येथील औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर रात्रीच्या वेळी आणि काही रस्त्यांवर भरदिवसाही वेश्या व्यवसायाला सुरू आहे. या गैरप्रकारांवर कारवाई व्हावी, अशी नागरिकांची, कामगारांची व उद्योजकांची मागणी आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीतील चाकण-तळेगाव रस्ता, एमआयडीसी फाटा-निघोजे रस्ता, चाकण-आळंदी रस्ता, या रस्त्यावर प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रात्री आठ ते बाराच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालतो. अनेक तृतीयपंथी, काही महिला, काही तरुणी या रस्त्यावर राजरोसपणे उभ्या असतात. येणारे-जाणारे काही कामगार, वाहन चालक तेथे थांबतात. अगदी वाहतूक विभागाच्या पोलिस चौकीजवळ हा व्यवसाय पुणे-नाशिक महामार्गाजवळ मोकळ्या जागेत दगडाच्या खाणीत सुरू असतो. आळंदी मार्गावर आळंदी फाट्याच्या पुढे दिवसाही वेश्या व्यवसाय सुरू असतो.
वेश्या व्यवसाय करताना काही अनधिकृत लॉजचा वापर केला जातो. महाळुंगे येथे तर चाकण-तळेगाव मार्गाच्या कडेला काही तात्पुरते आडोसे तृतीयपंथी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला तरुणींनी केले आहेत. रात्रीच्या वेळेस हे काळे धंदे येथे चालतात. काही घटना घडल्यास पोलिस कारवाई करतात, परंतु पोलिसांच्या कारवाईवरही मर्यादा येत आहेत. काहींची लुबाडणूक होते, काही जण तक्रार करतात. त्यावेळी पोलिस कारवाई करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT