पुणे

खेड तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी

CD

चाकण, ता. २३ : खेड तालुक्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा विजय आणि महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव खेड तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे. लोकसभेला खासदार अमोल कोल्हे यांना मताधिक्य मिळाले त्याचप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत बाबाजी काळे यांना तालुक्यातून मोठे मताधिक्य मिळाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांचा नातेवाईक वर्ग तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांनी नातेवाइकांवर मोठी भिस्त दिली होती. नातेवाइकांनी त्यांना मदत केली त्यामुळे त्यांचे मताधिक्य वाढले, असेही बोलले जाते. अनेक नातेवाइकांनी त्यांचा तालुक्यात फिरून प्रचार केला. नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यात बैलगाडा शर्यतीसाठी अनेक गावांत घाट बांधले होते. महिलांच्या तीर्थक्षेत्री सहली नेल्या होत्या. त्याचाही त्यांना फायदा झाला. त्यामुळे त्यांना मोठे मताधिक्य मिळाले. खेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार दिलीप मोहिते हे पराभूत झाले. त्या पराभवाची अनेक कारणे समोर येत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीवेळी खासदार अमोल कोल्हे यांच्या बाजूने सुप्त लाट होती. ती सुप्त लाट या वेळीही तशीच राहिली. ही लाट परतवण्यास आमदार दिलीप मोहिते व त्यांचे कार्यकर्ते कमी पडले. खासदार डॉ. कोल्हे यांना खेड तालुक्यातून ४५ हजारांचे मोठे मताधिक्य मिळाले होते. या वेळी बाबाजी काळे यांच्या मताधिक्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सुमारे ५१ हजारांचे मताधिक्य मिळाले. खासदार कोल्हे यांच्या निवडणुकीवेळी जे मतदार समाजघटक कोल्हे यांच्याकडे वळले होते, ते पुन्हा महायुतीकडे मतदानाला वळले नाही. माजी आमदार मोहिते यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचाराचे नियोजन व्यवस्थित करत असले, तरी प्रचाराच्या नियोजनात कमतरता पडली, असेही काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
नवनिर्वाचित आमदार बाबाजी काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अतुल देशमुख, सुधीर मुंगसे यांनी त्यांचे उमेदवारी अर्ज माघारी घेऊन बाबाजी काळे यांना मोठा फायदा झाला. माजी आमदार दिलीप मोहिते यांच्याविरोधात असलेली तीव्र नाराजी काही प्रमाणात मतदारांनी उघडपणे मतदान करून दाखवली. चाकण, राजगुरुनगर, आळंदी परिसरात माजी आमदार मोहिते यांना मोठा फटका बसला. खेड तालुक्याच्या पूर्व पट्ट्यात तसेच पश्‍चिम डोंगराळ भागातही मोहिते यांना मोठा फटका बसला. त्यामुळे शेवटच्या फेरीपर्यंत बाबाजी काळे आघाडी घेत राहिले. स्व. माजी आमदार सुरेश गोरे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचाही काळे यांना मोठा पाठिंबा मिळाला.

मी खुल्या दिल्याने पराभव स्वीकारलेला आहे. जनतेला जे हवे होते ते त्यांनी केलेले आहे. यामुळे खेड तालुका पुन्हा विकासाच्या बाबतीत १० वर्षे मागे जाणार आहे. तालुक्याला मंत्रिपदाची संधी ज्यावेळेस येते, त्याचवेळेस असा काही चमत्कार घडतो. येत्या दोन दिवसांत मी मेळावा घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार असून, तालुक्यातील राजकारणात सक्रिय राहणार आहे.
दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार

शापित लाल दिवा
२००४च्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळी अपक्ष उभे असलेले स्वर्गीय माजी आमदार नारायण पवार यांचा पराभव माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला होता. मी मंत्री होणार आहे, मला लाल दिवा मिळणार आहे, त्यामुळे मला मतदान करा, असे अनेक वेळा भाषणात स्व. माजी आमदार नारायण पवार यांनी जाहीर केले होते. समर्थक कार्यकर्ते, पदाधिकारी स्वर्गीय माजी आमदार नारायण पवार यांना मतदान करा असे सांगत होते, परंतु खेड तालुक्यातील लोकांनी त्यावेळी ऐकले नाही आणि त्यावेळी स्व. माजी आमदार नारायण पवार यांचा पराभव माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला. २० वर्षे आमदार राहूनही मंत्रिपदाची स्व. नारायण पवार यांची संधी हुकली. या वेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांनी व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी निवडून आल्यानंतर मोहिते मंत्री होणार आहेत, असे फलकही लावले होते, तसे जाहीरही केले होते. खेड तालुक्याने १५ वर्षे आमदारपद सांभाळलेल्या माजी आमदार दिलीप मोहिते यांचा पराभव केला. त्यामुळे जेव्हा, जेव्हा लाल दिव्याचा विषय येतो आणि लाल दिवा मिळण्याची संधी येते, त्यावेळेस विद्यमान आमदार पराभूत होतो. त्यामुळे हा लाल दिवा खेड तालुक्यासाठी शापित आहे का? अशीही चर्चा रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT