चाकण , ता. २४: येथील (ता. खेड) महात्मा फुले घाऊक बाजारात कर्नाटक राज्यातील बेळगाव येथून रताळ्याची तीस टन आवक झाली. त्यास ३० रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळाला. कार्तिक वारीमुळे रताळ्याला मागणी वाढली आहे. बाजारात कांद्यास प्रतिकिलोस किमान तीस ते कमाल साठ रुपये मिळाला. कांद्याची एक हजार क्विंटल तर सातारा,नगर,नाशिक येथून टोमॅटोची आवक चाळीस टन झाली. टोमॅटोचे बाजारभाव स्थिर होते.
बाजारात लसणाची आवक फक्त वीस क्विंटल झाली. घाऊक बाजारात त्यास ३२० रुपये तर किरकोळ बाजारात साडेतीनशे ते चारशे रुपये बाजारभाव मिळाला,
अशी माहिती खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय शिंदे, सचिव बाळासाहेब धंद्रे यांनी दिली.
बुलडाणा, नंदुरबार जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची सुमारे चाळीस टनांवर आवक झाली. हिरवी मिरची घाऊक बाजारात २० ते ३० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. टोमॅटोची आवक जिल्ह्यातून होत आहे. बटाट्याची आवक दोन हजार क्विंटल झाली. त्यास प्रतिकिलोला सुमारे २५ ते ३८ रुपये बाजारभाव मिळाला. बाजारात इंदोर, आग्रा येथून बटाट्याची आवक होत आहे.
फळभाज्यांचे प्रतिकिलोचे मिळालेला बाजारभाव : हिरवी मिरची-२० ते ३०, परवल -५०, हिरवा वाटाणा-८० ते १००, भेंडी-४० ते ५०, टोमॅटो-२० ते ३०, गवार- ५० ते ८०, फ्लॉवर २० ते २५, कोबी-१५ ते ३०, दुधी भोपळा-१० ते २०, राजमा वाल-१००, तुरमुड्या वाल-८० ते १००, चवळी- ३० ते ४०, शेवगा-५० ते ७०, ढोबळी मिरची- ५० ते ७०, आद्रक- ८० ते १००, तोंडले-३०, डांगर भोपळा -३० ते ४०, वांगी -४५ ते ५५, काकडी -१० ते १५, गाजर ३० ते ४०.
मेथीची जुडी २८ रुपये
कोथिंबीर, मेथीच्या सुमारे पन्नास हजार जुड्यांची आवक झाली. मेथीची एक जुडी १८ ते २८ रुपयाला विकली गेली. कोथिंबिरीची एक जुडी पाच ते दहा रुपयाला विकली गेली. शेपूची एक जुडी १० ते १५ रुपयाला विकली गेली. पालकच्या तीन हजार जुड्यांची आवक झाली. एक जुडी दहा ते पंधरा रुपयाला विकली गेली.
07700
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.