पुणे

‘एमआयडीसीतील बैठकीसाठी स्थानिक सरपंचांनाही बोलवावे’

CD

चाकण, ता. ३१ : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण (ता. खेड) औद्योगिक वसाहतीतील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी, कंपन्यांचे प्रश्न सुटण्यासाठी व्यावसायिक संघटनांचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कंपन्यांचे प्रतिनिधी, उद्योजक यांच्या समवेत नुकतीच बैठक घेतली. या बैठकीला औद्योगिक वसाहतीतील विविध गावातील सरपंचांना बोलावून त्यांच्या समस्या काय आहेत, हेही उद्योग मंत्र्यांनी ऐकून घेतले पाहिजे, अशी मागणी माजी सरपंच बाळासाहेब भोपे यांनी केली.
याबाबत ते म्हणाले, ‘‘सरकार फक्त कंपनी किंवा असोसिएशनचे नाही. कंपन्यांवरच खूप अन्याय होतो आहे, असे सध्याचे चित्र रंगवले जात आहे. परंतु, गाव पातळीवरील समस्यांबाबत सरपंच व इतर लोकांचे म्हणणेही सरकारने ऐकून घेतले पाहिजे. शासन फक्त असोसिएशन आणि कंपन्यांचे हित पाहतं का? उद्योगमंत्र्यांच्या बैठकीला शासनाने औद्योगिक क्षेत्रातील गावांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना बोलावणं गरजेचं होतं. त्यांना बोलावले असते तर त्यांच्याही समस्या उद्योगमंत्र्यांना, इतर अधिकाऱ्यांना, कंपन्यांना समजल्या असत्या. औद्योगिकीकरणामुळे औद्योगिक वसाहतीतील गावांत अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. गोरगरीब मुलांचा नोकरी, व्यवसायाचा प्रश्न मोठा आहे. औद्योगिक वसाहतीतील ग्रामपंचायतीतून काही कर एमआयडीसीला जमा होतो. त्यामधून ग्रामपंचायतीला काही कामे सुचवायची असतात. पण असा काहीच विचार केला जात नाही. पुढील काळात औद्योगिक वसाहतीतील गावांचे प्रतिनिधी म्हणून सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना देखील शासकीय अधिकाऱ्यांनी बोलावणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेल दरवाढीचा चौथा धक्का! सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

सकाळच्या गडबडीतही फिट राहण्यासाठी झटपट, हेल्दी आणि एनर्जीने भरलेला पीनट-बटर-बनाना रॅप, ५ मिनिटांत होतो तयार

आजचे राशिभविष्य - २५ मे २०२६

Panchang 25 May 2026 : पंचांग! सोमवारचे शुभ मुहूर्त, राहुकाळ, चंद्रबळ आणि धार्मिक विशेष जाणून घ्या

आजचे पंचांग आणि दिनविशेष - २५ मे २०२६

SCROLL FOR NEXT